Priya Bapat Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

पारंपारिक की प्लास्टिकचा कंदील?, मार्केटमध्ये कागदी कंदील मिळत नसल्याने Priya Bapat संतापली, थेट चाहत्यांनाच विचारला प्रश्न

Priya Bapat Post: प्रियाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priya Bapat On Plastic Kandil:

मराठी आणि हिंदीचित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रिया नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. प्रिया सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. ती नेहमी तिचे आणि उमेशचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. परंतु प्रियाने आता एक वेगळीच पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

दिवाळीला सुरूवात झाली असून बाजारात अनेक प्रकारचे कंदील आणि दिवे पाहायला मिळत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या कंदिलासंदर्भात प्रियाने पोस्ट शेअर केली आहे.

पारंपारिक कागदाचे कंदील पाहायला मिळत नसल्याने प्रियाने ही पोस्ट केली आहे. प्रियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर 'प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला आहे. आपले पारंपरिक कागदाचे कंदील सहजासहजी मिळतच नाहीत. मोजक्या काही टिकाणी मिळतात'. असं लिहित प्लॅस्टिकचे कंदील बघून कंटाळा आल्याचे सांगितले आहे.

बाजारात मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या कंदीलावर आणि पारंपारिक कंदील कमी होत असल्याची खंत प्रियाने व्यक्त केली आहे. 'तुम्हाला कोणता कंदील आवडतो?' असे विचारत प्रियाने प्रेक्षकांना प्रश्न विचारला आहे. अभिनेत्रीने पारंपारिक कंदील की कोणताही कंदील असे दोन पर्याय प्रेक्षकांना दिले आहेत. यावर अनेक लोकांनी पारंपारिक कंदील निवडल्याचे दिसून आले. बाजारात कागदाचे कंदील कमी झाल्याने अभिनेत्रीने ही पोस्ट केली आहे.

प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रिया-उमेश यांची जोडी तब्बल १० वर्षांनी रंगभूमीवर एकत्र आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT