मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे.
प्रिया बापटचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच प्रियाने आपल्या सोशल मीडियावर एक गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. प्रियाने "कजरा मोहब्बत वाला..." या गाण्यावर रील बनवली आहे. तिच्या सुमधुर आवाजाने सर्वांची मने जिंकली आहे. तिचा हा गाण्याचा रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रिया बापटला या गाण्यावर तबला वादक निखिल परळीकर तिला साथ देत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रिया बापटने तिचा हा छान गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. "कजरा मोहब्बत वाला..." (Kajra Mohabbat Wala) हे गाणे 'किस्मत' या चित्रपटातील आहे. हे गाणे १९६८ मध्ये प्रदर्शित झाले . "कजरा मोहब्बत वाला..." हे गाणे आशा भोसले आणि शमशद बेगम यांनी गायले आहे. प्रियाच्या या गाण्यावर अनेक कलाकारमंडळी आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.प्रियाच सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकताच 'झी मराठी अवॉर्ड' सोहळा पार पडला. त्यात प्रिया बापट हिने 'आभाळमाया 'मालिकेचं शीर्षकगीत गायले. जे ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत. प्रिया बापट आणि उमेश कामत चाहत्यांचे आवडते कपल आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.