Prajakta Mali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: तू लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं मिश्किल उत्तर; म्हणाली, 'तुम्हाला खरंच…'

Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला चाहत्याने थेट लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. तिने दिलेलं मजेशीर उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Prajakta Mali: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने हल्लीच चाहत्यांच्या काही खास प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यावेळी काही चाहत्यांनी तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. त्यावर तिने मिश्किलपणे उत्तर देत आपला मुद्दा ठेवला. नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?

प्राजक्ता माळी चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधताना लग्नाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर अनोखं उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर तिने चालवलेल्या प्रश्नोत्तर सत्रात एका चाहत्याने तिला थेट “तुम्ही कधी लग्न करणार?” असा प्रश्न विचारला. यावर प्राजक्ताने त्वरित उत्तर देण्याऐवजी चाहत्याला प्रत्युत्तर म्हणून “तुम्हाला खरंच वाटतं… की मी लग्न करावं?” असा प्रश्नच विचारला, त्यामुळे तिने हा प्रश्न चांगलाचं फिरवला. पण तिच्या या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांशी संवाद साधताना ती वेगवेगळ्या प्रश्नांना खुलेपणाने उत्तर देते. लग्नासोबतच या Q&A सेशनमध्ये तिने तिचा पहिला क्रश कोण होता याबद्दलही सांगितलं, ज्यावर तिने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचं नाव घेतलं. या संवादातून प्रेक्षकांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक मनोरंजक माहिती मिळाली आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्यामुळे मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिच्या कामामुळे ती टीव्ही शो आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रसिद्ध आहे. आगामी काळात प्राजक्ताला ‘देवखेळ’ नावाच्या प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. यामध्ये ती अजून एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT