त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

Trimbakeshwar Vip Darshan Scam: त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांची सुरु असणारी लूट आता पोलिसांच्या रडारवर आहे... पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून भाविकांची लूट करणाऱ्या आरोपींना कसं जेरबंद केलयं.... आणि त्र्यंबकेश्वरमधील एक विश्वस्त कसा अडचणीत आलाय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Police expose VIP darshan scam at Trimbakeshwar temple; accused arrested in sting operation
Police expose VIP darshan scam at Trimbakeshwar temple; accused arrested in sting operationSaam tv
Published On

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कमी वेळात दर्शनासाठी अधिकृतरित्या 200 रुपये फी आकारते...मात्र मंदिरातील एजंट आणि विश्वस्थांचे नातेवाईक भाविकांकडून दर्शनासाठी 3 हजार रुपये उकळत असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली...3 हजार रुपयात अवघ्या 10 मिनटात व्हीआयपी दर्शन एजंट घडवून आणायचे...मंदिराच्या पूर्व दरवाजातून अधिकाराचा गैरवापर करत दररोज 100 ते 150 भाविकांना बेकायदेशीरपणे दर्शनासाठी सोडलं जात असल्याचाही आरोप होता...

याचं प्रकरणी दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता...भाविकाकडून 3 हजार रुपये उकळल्याचा आरोप पुतण्यावर होता...त्याचं प्रकरणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून कडलग यांच्या 2 नातेवाईकांसह एका एंजटलाही अटक केलीय..

दरम्यान मंदिर संस्थानच्या विश्वस्थाला याप्रकरणी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय...त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनाही अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात... अशातच भाविकांच्या सुरक्षेसोबत त्याच्या खिशाला कात्री लागू नये आणि दलालांकडून होणारी लूट थांबवी, यासाठी पोलिसांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन महत्त्वाचं आहे... मात्र आता दर्शनाचा स्कॅम करणाऱ्या या संपूर्ण रॅकेटचा छडा लावणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे...हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com