नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Praniti Shinde Raises Alarm Over Possible: नराधम खरातचा एन्काऊंटर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.. मात्र खरातच्या एन्काऊंटरबाबत कुणी वक्तव्य केलंय... आणि सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलंय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Political tensions rise as leaders react to speculation over Kharaat’s possible encounter amid ED probe.
Political tensions rise as leaders react to speculation over Kharaat’s possible encounter amid ED probe.saam tv
Published On

राज्याला हादरवणाऱ्या भोंदू खरातचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत.. आधी एसआयटी आणि आता ईडीनंही खरातच्या चौकशीचा फास आवळलाय.. त्यातच सत्ताधारी नेते, मंत्री आणि अधिकाऱ्यांशी खरातचं नाव जोडलं जातंय.. त्यामुळेच भविष्यात भोंदू खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असं वक्तव्य काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलंय..

17 मार्चला खरातने महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि राज्यात खळबळ उडाली.. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले.... एवढंच नाही तर खरातनं राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी भक्तांच्या माध्यमातून हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलंय... मात्र खरातच्या याच हजारो कोटींच्या संपत्तीत अधिकारी, नेत्यांचा काळा पैसा असण्याचा संशय व्यक्त केला जातोय.. त्यामुळेच खरात कनेक्शन अंगलट येऊ नये म्हणून खरातचा एन्काऊंटर होण्याची भीती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही व्यक्त केली होती.... तर विरोधक चुकीची वक्तव्य करुन चौकशी भरकटवत असल्याचा आरोप सरकारनं केलाय..

नराधम खरात प्रकरणी ईडीनं चौकशीचा फास आवळलाय.. त्यामुळे खरातचं राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचं आर्थिक कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे... याच दरम्यान चौकशीवेळी खरातनं माझं मरण इथंच, असं वक्तव्य केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतच खरातलाही एन्काऊंटरचा संशय आहे का? असाच सवाल उपस्थित केला जातोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com