Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

Mumbai Crime: बोरिवलीमध्ये म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा झाला आहे. या ठिकाणी नशेखोरांना रोखण्यासाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी ६ जणांना अटक केली.

बोरीवलीतील गोराईमध्ये म्हाडाच्या बंद चौकीवर नशेखोरांनी कब्जा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. २० ते २५ जण चौकीत बसून नशा करत असल्याचं समोर आलं आहे. याची माहिती मिळताच घुसखोरी रोखण्यासाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर नशेखोरांनी हल्ला केल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली.

बोरीवली पश्चिमेच्या गोराई येथील म्हाडाच्या रेंट कलेक्शन चौकीवर नशेखोर आणि दारुड्यांनी कब्जा केला. सुमारे २० ते २५ जण चौकीत बसून नशा करत असल्याचा प्रकार उघड झाला. गेली ३ वर्षे चौकी बंद आहे. तरीही सुरक्षारक्षक नियुक्त असल्याची माहिती समोर आली आहे. चौकीत अवैध बेड, २ गॅस सिलेंडर, रोज मटन-चिकन आणि दारू पार्ट्या सुरू होत्या. परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

गार्डनमध्ये येणाऱ्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. माहिती मिळताच भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या कार्यकर्त्यांची घटनास्थळी धाव घेतली. कार्यकर्ते आणि पोलिसांवर नशेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी ६ नशेखोरांना अटक केली. तर इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बोरीवली पोलिस ठाण्यात ५ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com