नाशिकमध्ये म्हाडा घराच्या कोट्याबाबत मोठा घोटाळा उघडलीक आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. काही बिल्डरांनी बनावट, खोट्या साही शिक्कयांचा वापर करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तब्बल 49 बांधकाम व्यावसायिकांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रसारमध्यमांशी संवाद साधतांना त्यांना याबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, गरिबांसाठीची घरे खाल्ली गेली आहेत. दोषींना कुणालाही सोडणार नाही. गरज पडल्यास हे प्रकरण ED कडे देऊ, असे सांगत SIT स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील 15 दिवसांत अहवाल येणार असल्याचेही ते म्हणाले.
भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी याला महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना म्हटले. SIT मार्फत चौकशी सुरू असून संबंधित आश्रम आणि परिसरातील CCTV तपासले जाणार आहेत. खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार आहे. कुणीही दोषी आढळल्यास केवळ बदली नाही तर थेट बडतर्फीची कारवाई होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
बावनकुळे म्हणाले की, त्यांच्या नावावर 80 एकर शेती दाखवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे. माझ्याकडे 28 एकरच जमीन आहे. काही लोक मुद्दाम बदनाम करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मी 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर पोस्ट करणारे आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.