Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा राग अनावर, 'तो' फोटो शेअर करत म्हणाली- "असले उद्योग थांबवा..."

Prajakta Mali Angry On Fans : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या चाहत्यांवर भडकली आहे. तिने एक पोस्ट करून याबाबत सांगितले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्राजक्ता माळी चाहत्यांवर प्रचंड भडकली आहे.

प्राजक्ता माळी AI द्वारे बनवलेला फोटो पाहून चिडली.

प्राजक्ता माळी मराठी इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री आहे.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तिचा 'फुलवंती' चित्रपट आजही खूप गाजतो. प्राजक्ताच्या सौंदर्याचे आणि तिच्या स्टाइलचे लाखो चाहते दिवाने आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो, व्हिडीओ आणि कामासंबंधित पोस्ट करत राहते.

प्राजक्ता माळीचा सुंदर, पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे. ज्याचे ती वारंवार फोटो शेअर करते. जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या AIचा काळ सुरू आहे. त्यामुळे AIचा वापर करून कलाकारांचे अनेक फोटो तयार केले जातात. अशाच संबंधित एक पोस्ट प्राजक्ता माळीने केली. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्राजक्ताचा साडीतील एक फोटो AI द्वारे तयार करण्यात आला. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र फोटो पाहताच प्राजक्ता माळी चाहत्यांवर प्रचंड संतापली.

प्राजक्ता माळीचा AI फोटो तिच्या एका फॅन पेजने तयार केला होता. प्राजक्ता माळीने AI द्वारे बनवलेला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करून त्यावर एक संदेश लिहिला होता. तिने लिहिलं की, "तो फोटो कितीही सुंदर दिसत असला तरी... मी 'एआय' (AI) द्वारे तयार केलेल्या फोटो आणि व्हिडिओंचे कधीही कौतुक करणार नाही... माझ्या फॅन क्लब्सना आणि बाहेरच्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, हे बनवणे थांबवा..." अशा कडक शब्दात चाहत्यांना आणि फॅन पेजना विनंती केली.

Prajakta Mali

AI फोटोमुळे अनेक वेळा दिशाभूल होते. तसेच या फोटोंचा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे प्राजक्ता माळीने चाहत्यांना AI द्वारे फोटो न बनवण्याची विनंती केली आहे. प्राजक्ता माळी एक अभिनेत्री, निर्माती, व्यवसायिका, कवियत्री आहे. ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचे होस्टिंग करते. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लेकीसाठी बाप वाघ झाला! छेडणाऱ्याला कॉलेजमध्ये तुडवले, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रकार

Maharashtra Live News Update : शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

Government Scheme: लाडकीसाठी फडणवीस सरकारची खास योजना, तब्बल ३०० कोटींची तरतूद; मिळणार आता १० लाखांपर्यंत कर्ज, वाचा

Yoga Exercise For Glowing Skin: सकाळी फक्त १० मिनिटे योगा करा, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Jalna–Jalgaon Railway Project: जालना ते जळगाव धावणार रेल्वे; ५,८०४ कोटींचा निधी मंजूर, १७ नवीन स्थानके असणारा नवा रेल्वे मार्ग कसा असेल?

SCROLL FOR NEXT