Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत अनोखी छाप पाडली आहे.
प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी नृत्यागंणा देखील आहे.
प्राजक्ता माळी ही अभिनयासोबतच तिच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते. सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होतात.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. अप्रतिम असं प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे.
प्राजक्ताने साडी लूक केला आहे. तिने मराठमोळ्या साजश्रृंगार केला आहे ज्यामध्ये तिने कानातले, नथ, बाजूबंद असा श्रृगांर केला आहे.
प्राजक्ता माळीच्या या फोटोतील कातील लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे. तिचा लूक खूपच भारी दिसत आहे.
प्राजक्ता वेस्टर्न किंवा पारंपारिक या दोन्ही लूकमध्ये उठून दिसते चाहते देखील तिच्या फोटोंना लाईक्स देतात.