राज्यामध्ये मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये आंदोलनावर बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून सध्या वातावरण तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं, बंद पुकारण्यात येत आहेत.
अशामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) कलाकारांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेता हेमंत ढोमे, अश्विनी महांगडेनंतर आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर पोस्ट करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
प्राजक्ता गायकवाडने आपल्या अनधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमध्ये येसूबाईची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'रक्त उसळलंय... रक्त पेटलंय...' असं लिहिले आहे. तसंच तिने या पोस्टला #९६कुळीमराठा #अभिमान #एकमराठालाखमराठा हे हॅशटॅग वापरले आहेत.
या पोस्टच्या माध्यमातून प्राजक्ता गायकवाडने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या इन्स्टा पोस्टवर कमेंट्स चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. यूजने कमेंट्स करत असे लिहिले आहे की, 'खरंच आज अभिमान वाटत आहे तुमचा की एक सेलिब्रिटी मराठा आरक्षणावर ऐवढे आत्मियतेने पोस्ट करत आहेत. नाही तर बाकीचे सगळे सेलिब्रिटी मराठा आरक्षणावर एक पोस्ट करत नाही आहेत. अभिमान आहे तुमचा आम्हां सर्वांना. जय शिवराय जय शंभूराजे'
तर, आणखी एका यूजरने कमेंटमध्ये असे म्हटले आहे की, 'कालची परिस्थिती बघता महाराणी येसूबाईंचं रक्त असच उसळलं असतं. आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, कूलमुख्त्यार महाराणी येसूराणीसाहेब यांची खूप आठवण येते.'
दरम्यान, जालन्याच्या घटनेनंतर अभिनेता हेमंत ढोमे याने देखील संताप व्यक्त करत ट्विटरवर पोस्ट केली होती. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'अभिनेते हेमंत ढोमे यांनी ट्वीट केलं आहे,"जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी.. आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी...राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.