Meera Joshi In Daar Ughad Baye: ‘दार उघड बये’मध्ये शरद पोंक्षेंसोबत दिसणार मीरा जोशी, मालिकेमध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Meera Joshi New Serial: लवकरच येत्या काही दिवसांत मीरा जोशी एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Meera Joshi In Daar Ughad Baye
Meera Joshi In Daar Ughad BayeInstagram

Meera Joshi In Daar Ughad Baye

टेलिव्हिजन अभिनेत्री मीरा जोशी गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. कधी आपल्या रिलेशनच्या चर्चेमुळे, तर कधी तिच्या आगामी गाण्यामुळे चर्चेत असलेली मीरा यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री मीरा जोशी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. लवकरच अभिनेत्री येत्या काही दिवसांत एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Meera Joshi In Daar Ughad Baye
Super Human Weapon Teaser: 'बाहुबली' तल्या कट्टपानं सुरु केलं नवं युद्ध, 'सुपर ह्यूमन वेपन'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सुद्धा रंगली होती. पण या सर्व गोष्टी सपशेल खोट्या ठरल्या. अभिनेत्रीचा हा एका गाण्यासाठी प्रमोशनल भाग होता. नुकताच अभिनेत्रीच्या आणखी एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले.

लवकरच ती एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या भूमिकेचा टीझर शेअर करताना, अभिनेत्री व्हिडीओमध्ये चंद्रा गाण्यावर थिरकताना दिसते. तिच्यासमोर अभिनेते शरद पोंक्षे बसलेले दिसत आहे. अभिनेत्री झी मराठीवर टेलिकास्ट होणारी, ‘दार उघड बये’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Meera Joshi In Daar Ughad Baye
Nargis Fakhri On Teachers Day: खरा शिक्षक कोण?, ' अभिनेत्री नर्गिस फाखरीने सांगितला नेमका अर्थ

अभिनेत्री मीरा जोशीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “मी ‘चंपा’ येतेय तुमचं मनोरंजन करायला आजपासून रोज रात्री ८.३० वाजता. मालिका ‘दार उघड बये’मध्ये… अर्थात आपल्या लाडक्या ‘झी मराठी’ वाहिनीवर.” या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्रीचा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हा टीझर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

मीरा जोशीच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती एक उत्तम अभिनेत्री असून उत्तम नृत्यांगना देखील आहे. मीराने तिच्या सिनेकारकिर्दित ‘कुलस्वामिनी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या टेलिव्हिजन मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली. सोबतच मीरा ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातही झळकली होती. तर अभिनेत्रीने चित्रपटातही काम केले आहे. ‘चालू द्या तुमचं’, ‘शिवा’, ‘वृत्ती’, ‘लाल बत्ती’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ अशा अनेक चित्रपटातून मीराने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com