Prachi Pisat House Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prachi Pisat: स्वप्नपूर्ती! 'तू चालं पुढं' फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, पाहा इनसाइड VIDEO

Prachi Pisat House Video: झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'तू चालं पुढे'ने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. या मालिकेमध्ये प्राची पिसाट मुख्य भूमिकेत होती. प्राचीने या मालिकेमध्ये ताराची भूमिका साकारली होती. तिचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले.

Priya More

Prachi Pisat New House:

मराठी मनोरंजनसृष्टीतील (Marathi Film Industry) कलाकारांसाठी २०२३ आणि २०२४ हे वर्ष खूपच चांगले ठरत आहे. या वर्षामध्ये काही कलाकारांनी लग्न करत आयुष्याची नवी सुरूवात केली तर काही कलाकारांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले. त्यांचे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्यांनी खूप आनंद व्यक्त केला. चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.

या कलाकारांमध्ये प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, प्रसाद खांडेकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, अक्षय केळकर आणि अश्विनी कासार याच्या नावाचा समावेश आहे. आता या कलाकारांच्या यादीमध्ये आणखी एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. प्राची पिसाट (Prachi Pisat) असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'तू चालं पुढे'ने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. या मालिकेमध्ये दीपा परब, आदित्य वैद्य, धनश्री काडगावकर, प्रतिभा गोरेगावकर आणि प्राची पिसाट हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. प्राचीने या मालिकेमध्ये ताराची भूमिका साकारली होती. तिचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले. आता प्राचीने मुंबईमध्ये स्वत:चे हक्काचे घर घेतलं आहे. तिने सोशल मीडियावर आलिशान घराचा व्हिडीओ शेअर करत ही गुड न्यूज शेअर केली आहे.

प्राची पिसाटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन घरामध्ये पूजा करताना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राची आपल्या नवीन घराच्या किचनमध्ये अग्निदेवतेची पूजा करताना दिसत आहे. तिने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. ती कुकरमध्ये अन्न शिजवताना दिसत आहे. आपल्या नवीन घराचा व्हिडीओ शेअर करत प्राचीने कॅप्शनमध्ये 'नवीन सुरूवात' असे लिहिले आहे.

प्राचीच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टला चांगली पसंती दिली आहे. त्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, प्राचीना आपल्या करिअरची सुरूवात मालिकेतून केली. तिने अनेक मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. 'नकळत सारे घडले', 'तू चालं पुढे' या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

SCROLL FOR NEXT