Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

शुभ मंगल सावधान! Pooja Sawant आणि Siddhesh Chavan अडकले विवाहबंधनात, लग्नानंतरचा पहिला VIDEO आला समोर

Pooja Sawant And Siddhesh Chavan Wedding: गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज मोठ्या थाटामाटामध्ये पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा विवाहसोहळा पार पडला. जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये पूजा आणि सिद्धेश यांनी लग्न केले.

Priya More

Pooja Sawant And Siddhesh Chavan:

मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) अखेर आज विवाहबंधनात अडकली. पूजा सावंतने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज मोठ्या थाटामाटामध्ये पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा विवाहसोहळा पार पडला. जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये पूजा आणि सिद्धेश यांनी लग्न केले. मराठी सिनेसृ्ष्टीतील अनेक कलाकारांनी पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाला हजेरी लावली.

लग्नानंतर पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण माध्यमांसमोर आले. लग्नानंतरचा त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. पूजा आणि सिद्धेश यांनी लग्नामध्ये खूपच सुंदर ड्रेसिंग केली होती. पूजाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. गळ्यात सुंदर मंगळसुत्र आणि दागिने, हातामध्ये हिरव्या बांगड्या, मोकळे केस असा लूक पूजाने केला होता. नववधूच्या रुपामध्ये पूजा खूपच क्युट दिसत होती. तर सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो देखील खूपच हँडसम दिसत होता. लग्नानंतर माध्यमांसमोर आल्यानंतर या जोडप्यांनी सुंदर उखाणा देखील घेतला.

पूजा आणि सिद्धेशच्या लग्नापूर्वीचे विधी गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू होते. संगीत, हळदी, मेहंदी सिरेमनी पार पडल्यानंतर हे कपल आज विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधीचे म्हणजेच संगीत, मेहंदी, हळदी सिरेमनीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाचा व्हिडीओ किंवा फोटो अद्याप समोर आले नाहीत. पण लग्नानंतर हे कपल माध्यमांसमोर आले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. सध्या या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून चाहत्यांनी दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नाला अभिजीत आणि सुखदा खांडकेकर, प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी हजेरी लावली. हे सर्व कलाकार पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधीला देखील आले होते. दरम्यान, पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचे हे अरेंज मॅरेज आहे. २८ नोव्हेंबरला पूजा सावंतने इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड सिद्धेशसोबतचा फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सिद्धेश चव्हाण असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनान्ससंबंधित काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT