mrunmayee deshpande wish gautami deshpande on her birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

कशाला जीव घेते तिचा..., Gautami Deshpande ला वाढदिवसानिमित्त मृण्मयीने दिल्या अशा शुभेच्छा; VIDEO वर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande: गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) या बहिणींचं प्रेम आपण सोशल मीडियावर नेहमीच बघत असतो. या बहिणींमधील रुसवे-फुगवे, भांडणं आपण पाहिले आहेत.

Priya More

Gautami Deshpande Birthday:

‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमीचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) या बहिणींचं प्रेम आपण सोशल मीडियावर नेहमीच बघत असतो. या बहिणींमधील रुसवे-फुगवे, भांडणं आपण पाहिले आहेत. गौतमीच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने खास स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

गौतमीच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने तिला मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत. झोपलेल्या गौतमीच्या अंगावर बसून मृण्मयीने तिला जबरदस्ती उठवले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मृण्मयीने गौतमीला खूप त्रास दिला. त्यानंतर तिने गौतमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मृण्मयी शेवटी गौतमीला झोपेतून उठवतेच. या बहिणींचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौतमीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'यासाठी मला न्याय हवाय! घरातल्या धाकट्या भावडांनी कृपया कमेंट्समध्ये आपली मतं मांडा. थँक्स पण, नो थँक्स ताई!' तिच्या या व्हिडीओला नेटिझिन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, गौतू तुझ्या पेशनची कमाल आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'तात्या विंचू आणि लक्ष्या मामा आठवले. माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'कशाला जीव घेते तिचा' अशाप्रकारच्या मजेशीर कमेंट्स त्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

SCROLL FOR NEXT