Sharad Ponkshe: दरवाजावर कोणीही आलं तरी..., मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या वादावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

Pushkar Jog Maratha Arakashan Post: जातीवरून प्रश्न विचारल्यामुळे पुष्कर जोग चांगलाच संतप्त झाला होता. त्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत राग व्यक्त केला होता. या पोस्टनंतर पुष्कर जोगला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
Sharad Ponkshe
Sharad Ponkshesaam tv
Published On

Sharad Ponkshe On Maratha Reservation Survey:

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने (Pushkar Jog) दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी (Maratha Reservation Survey) घरी आलेल्या बीएमसी कर्मचारी (BMC Worker) महिलेबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली होती. जातीवरून प्रश्न विचारल्यामुळे पुष्कर जोग चांगलाच संतप्त झाला होता. त्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत राग व्यक्त केला होता. या पोस्टनंतर पुष्कर जोगला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ऐवढंच नाही तर अनेक मराठी सेलिब्रिटींनी देखील पुष्कर जोगला खडेबोल सुनावले आहेत. पुष्कर जोगच्या या वादग्रस्त पोस्टवर मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पुष्कर जोगवर सध्या टीकेची झोड सुरू आहे. अशामध्ये अभिनेत्याने दिलगिरी देखील व्यक्त केली होती. अभिनेत्याच्या या पोस्टनंतर मराठी अभिनेता अभिजीत केळकर, अभिनेत्री आणि लावणी क्वीन मेघा घाडगे यांनी पुष्करची शाळा घेतली. त्यानंतर आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी अभिजीत केळकरच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांच्या या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.

Sharad Ponkshe
Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने नव्या व्यवसायात ठेवलं पाऊल, पुण्यात सुरू केलं आलिशान सलून; VIDEO व्हायरल

शरद पोंक्षे यांनी या कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, 'माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहा-पाणी विचारले व मी ब्राह्मण आहे. मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको, असं नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे. नकारसुद्धा नम्रपणे देता येतो.' शरद पोंक्षे यांनी मोजक्या शब्दांमध्येच यावर उत्तर दिलं आहे.

Sharad Ponkshe
Sharad PonksheSocial Media

पुष्कर जोगच्या वादग्रस्त पोस्टवर अभिनेत्री आणि लावणी क्वीन मेघा घाडगेने देखील पोस्ट केली आहे. तिची पोस्ट देखील चर्चेत आली आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार?? बाई-माणूस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या?? तुला २ लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघून मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार?'

Megha Ghadge Post
Megha Ghadge PostInstagram

मेघा घाडगे यांनी या पोस्टमध्ये पुढे देखील असे लिहिले आहे की, 'अरे मित्रा… त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा लागतो. आजूबाजूला थोडी चौकशी करावी लागते! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, मी तुला नक्की पाठवेन. ते सुद्धा नको असेल तर तुझ्याच जातीचे माझे काही मित्र-मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर… वा घाण…वा घाण…वा घाण…!', अशा शब्दामध्ये मेघा घाटगेने पुष्करची शाळा घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com