Megha Ghadge Saam Digital
मनोरंजन बातम्या

Megha Ghadge: "किंग कोरोना परत आलाय!", हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

Megha Ghadge Video: बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.मेघाने पोस्ट केलेल्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिला नेमकं काय झालंय हे जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Megha Ghadge Hospitalized

बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मेघा घाडगेला 'लावणी क्वीन' ओळखलं जातं. मेघाने काही मराठी सिनेमातही उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मेघा चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेघाने पोस्ट केलेल्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिला नेमकं काय झालंय हे जाणून घेऊयात.

मेघाला नेमकं काय झालंय?

मेघाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत स्वतःच्या आजारपणाचा खुलासा केला आहे. यात मेघा हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसत आहे. तसेच रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असल्याचं पाहायला दिसून येत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की,"बुखार … !31st येतोय .. किंग करोना परत आलाय please काळजी घ्या, मित्रमैत्रिणींनो 2024ची तुम्हा सर्वांना निरोगी आणि सुख, समृद्धी , भर भरभरून यश मिळो ..!"

मेघा काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिचा वाढदिवसही रुग्णालयातच साजरा केला होता.

मेघाने रुग्णालयातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिचे रुग्णालयातील फोटो पाहून काही कलाकार आणि चाहत्यांनी पोस्टमधील कमेंटमध्ये विचारपूस देखील केली आहे. मेघाच्या चाहत्यांनी तिला कमेंटमध्ये काळजी घे, अशा प्रतिक्रियाही केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT