PVR-INOX Subscription: मनोरंजन प्रेमींसाठी खास ऑफर! ७० रुपयांत पाहाता येणार कोणताही चित्रपट; PVR-INOX चा नवा प्लान

PVR-INOX Subscription News: चित्रपटप्रेमींना १३ ऑक्टोबर म्हणजेच राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केल्यानंतर आता आणखी एकदा कमी पैशात चित्रपट पाहायला मिळणार आहे.
PVR-INOX Subscription
PVR-INOX SubscriptionSaam Tv
Published On

PVR-INOX Is Coming With Monthly Subscription

चित्रपटप्रेमींना १३ ऑक्टोबर म्हणजेच राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केल्यानंतर आता आणखी एकदा कमी पैशात चित्रपट पाहायला मिळणार आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स हे थिएटर्स सिनेरसिकांसाठी एक नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. अधिकाधिक प्रेक्षकांनी चित्रपट पहावे, यासाठी एक स्किम जाहीर केली आहे.

PVR-INOX Subscription
Shivrayancha Chava Film Create History In Marathi Cinema: दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ने प्रदर्शनाआधीच रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला मराठी चित्रपट

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, पीव्हीआर आणि आयनॉक्स या थिएटर्समध्ये प्रेक्षकांना महिन्याला दहा चित्रपट केवळ ६९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहेत. या योजनेअंतर्गत सोमवार ते गुरुवार ७० रुपयांचे तिकिट प्रेक्षक खरेदी करु शकतील. या प्लॅन अंतर्गत एका महिन्यात युजर १० चित्रपटांचा आनंद लुटू शकतो.

त्यासोबतच सिनेरसिकांना ही ऑफर विकेंडला म्हणजेच शुक्रवार ते रविवार या दिवसात ॲक्टिव्ह नसेल. दक्षिण भारत आणि Insignia आणि IMAX सारख्या प्रिमियम स्क्रिनला देखील ही ऑफर उपलब्ध नाही.

PVR-INOX Subscription
Bigg Boss 17 Contestant List: ‘बिग बॉस १७’च्या घरात होणार नवीन स्पर्धकांची एन्ट्री; नावेही आली समोर, वाचा संपूर्ण यादी

या ऑफरमध्ये, प्रेक्षकांना एका दिवसात एकच तिकिट काढता येणार आहे. यावेळी प्रेक्षकांना आपल्या सोबत सरकारी ओळखपत्र देखील सोबत ठेवायला लागणार आहे. खरंतर, वैश्विक कोरोना महामारीनंतर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये जाण्याचा कल कमी झाला होता. यामुळे पीव्हीआर आणि आयनॉक्स या थिएटरमालकांनी प्रेक्षकांची संख्या वाढावी यासाठी ही अनोखी शक्कल वापरली आहे.

PVR-INOX Subscription
Priya Bapat Post: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार, सोशल मीडियावर रंगली तुफान चर्चा; पाहा फोटो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com