Meera Joshi Post Instagram @meerajoshi_
मनोरंजन बातम्या

Meera Joshi: 'मी स्वप्नातही विचार केला नव्हता...'; मीरा जोशी करणार 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर

Meera Joshi Post : मीरा जोशी लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Meera Joshi Share Post With Sharib Hashmi:

टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. मीरा नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. मीरा जोशी लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये मीराने 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेता शारिब हाश्मीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आगामी प्रोजेक्टमध्ये ती शारिब हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं दिसून येत आहे.

हिंदीतील 'द फॅमिली मॅन' ही वेबसीरीज अत्यंत लोकप्रिय आहे. या सीरीजमधील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे शारिब हाश्मी. शारिब हाश्मी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. लवकरच मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी शारिब हाश्मीसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मीरा जोशी ही नेहमीच सोशल मीडियावर काही न काही शेअर करत असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मीराने इन्स्टाग्रामवर शारिब हाश्मीसोबतचा फोटो शेअर केला आहे.२०२० मध्ये दरबानमध्ये त्यांचे (शारिब हाश्मी) काम पाहिल्यानंतर त्यांचे कौतुक करत मेसेज पाठवला होता. त्यांनीही मला कृतज्ञनतेने रिप्लाय केला होता. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, एके दिवशी मी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करेन. तुमच्या अभिनयाबद्दल मी काय बोलाव! तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारख आहे. असं कॅप्शन मीराने दिले आहे.

मीराच्या या पोस्टवर शारिब हाश्मीने तिचे आभार मानले आहे. तुझ्या कौतुकासाठी खूप खूप आभार. तू अप्रतिम आहेस. अशी कमेंट शारिबने केली आहे. मीराच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

मीरा जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मीरा अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे. 'कुलस्वामिनी', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'तुझं माझं ब्रेकअप' या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. याचसोबत ती 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमातदेखील झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT