Javed Akhtar: राम आणि सीता यांना आजही या देशाची संपत्ती मानतो, अन् भर कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी केली 'जय सिया राम'ची घोषणा

Javed Akhtar Video: ऐवढंच नाही तर जावेद अख्तर यांनी भर कार्यक्रमात स्टेजवर बसून जय सिया रामाची घोषणा केली.
Javed Akhtar
Javed AkhtarSaam Tv
Published On

Javed Akhtar On Lord Ram And Sita:

बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ कवी आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhatar) आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि गीत यामुळे नेहमी चर्चेत असतात. देशासह जगभरात सुरू असलेल्या कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवर ते मत व्यक्त करत असतात.

नुकताच त्यांनी प्रभू राम आणि सीता यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. या वक्तमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. 'भगवान राम आणि सीता (Ram And Sita) हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.', असे ते म्हणाले. ऐवढंच नाही तर त्यांनी भर कार्यक्रमात स्टेजवर बसून जय सिया रामाची घोषणा केली. जावेद अख्तर सध्या त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईमध्ये दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाचं उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कलावंत सलीम-जावेद आणि गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमात गीतकार जावेद अख्तर यांनी या कार्यक्रमात सांगितले की, 'भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल. रामायण हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. राम आणि सीतेच्या भूमीत जन्म घेतल्याचा आपल्याला अभिमान आहे.' तसंच, 'राम आणि सीता हे केवळ हिंदूंचे देवी-देवता नाहीत. हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. मी नास्तिक असलो तरी राम आणि सीता यांना आजही या देशाची संपत्ती मानतो, म्हणूनच मी इथे आलो आहे.', असे त्यांनी सांगितले.

Javed Akhtar
Sunny Leone: ९ वर्षांच्या बेपत्ता मुलीच्या मदतीसाठी धावून आली सनी लिओनी, शोधणाऱ्याला बक्षीस म्हणून देणार इतकी रक्कम

त्यासोबतच, 'रामायण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा तुमच्या आवडीचा विषय आहे. मला अभिमान आहे की मी राम आणि सीतेच्या भूमीवर जन्मलो, जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तमबद्दल बोलतो तेव्हा फक्त राम आणि सीता लक्षात येतात. त्यामुळे आजपासून जय सियाराम.' यावेळी जावेद अख्तर यांनी उपस्थित लोकांना 'जय सिया राम'चा नारा देण्यासही सांगितले.

Javed Akhtar
Deepika Padukone ची 'जस्ट लुकिंग लाइक अ वाव' रील ठरली ब्लॉकबस्टर, व्ह्यूजमध्ये सलमानच्या 'Tiger 3' चा रेकॉर्ड मोडला

या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी लखनऊमधील त्यांच्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, 'लोक तिथे 'जय सिया राम' म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत असत. मी लखनऊचा आहे. माझ्या लहानपणी मी श्रीमंत लोकांना गुड मॉर्निंग म्हणताना पाहायचो, पण रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस जय सिया राम म्हणायचा. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणे हे पाप आहे. सिया राम हा शब्द प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. फक्त एकाने सिया आणि राम यांना वेगळे केले. त्याचे नाव रावण होते. तर जो वेगळा होईल तो रावण होईल. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत तीन वेळा जय सिया रामचा जप करा. आजपासून जय सिया राम म्हणा.'

Javed Akhtar
Anushka Sharma Baby Bump: अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार?, अभिनेत्रीचा बेबीबंप दिसला, VIDEO पाहून चाहते उत्सुक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com