Ketaki Chitale  Saam Tv
मनोरंजन बातम्या

केतकी चितळेला जेल की बेल? आज पोलीस कोठडी संपणार

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला १४ मे रोजी अटक केली होती.

विकास काटे, साम टीव्ही

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदर पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. आता तिचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलीस तयारीत असून तिला आता पुन्हा पोलीस कोठडीच मिळते की न्यायालयीन कोठडी हे मात्र ठाणे न्यायालयात ठरणार आहे. काल तिची ठाणे पोलिसांनी आठ तास चौकशी केली.

ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरुद्ध कलम ५००, ५०१ आणि १५३ अन्वये (बदनामी करणे, तेढ निर्माण करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला १४ मे रोजी अटक केली होती. तिची अजूनही चौकशी सुरु आहे.

हे देखील पाहा -

हीच चौकशी पूर्ण न झाल्याने ठाणे पोलीस आज पुन्हा तिला वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी ठाणे न्यायालयाला करण्याची शक्यता आहे. तिच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीच नसल्याने आता पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यताही जवळपास कमी आहे. ठाणे पोलिसांनी तिला अटक केली, त्याचवेळी गोरेगाव पोलीसही तिचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायायालत दाखल झाले होते. त्यामुळे तिला ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रीया पूर्ण केल्यास न्यायालयातून गोरेगाव पोलिसांना केतकीचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल?

कळवा, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला,आमरावती येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT