Hemal Ingle Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemal Ingle Engagement : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्रीच्या नव्या इनिंगला सुरूवात, EX-Boyfriend सोबत उरकला साखरपुडा

Hemal Ingle Engagement : अभिनेत्री हेमल इंगळे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. हेमलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Chetan Bodke

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपट येत्या २० सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बहुचर्चित ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटामध्ये अनेक नवीन स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री हेमल इंगळेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या हेमल इंगळे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. हेमलने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री हेमल इंगळे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. नुकतंच तिने फोटो शेअर करत चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे. हेमलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत, एक्स बॉयफ्रेंड म्हणत इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. हेमलच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव रौनक कोरडीया आहे. ते दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. रौनकचा ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय आहे. हेमलच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

श्रिया पिळगांवकर, रसिका वेंगूर्लेकर, मुग्धा चाफेकर, फुलवा खामकर, स्वप्नील जोशी अश्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. हेमल इंगळेने 'अशी ही आशिकी' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केल. त्यात अभिनय बेर्डे सोबत तीने काम केलं आणि मराठी बरोबर तेलगू चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे. ती २०१६-१७ची मिस इंडिया ठरली होती.

"नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा २" हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस.टी.बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT