Harshada Khanvilkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Harshada Khanvilkar : "बाप्पाचं नाव शाहरुख ठेवलंय..."; हर्षदा खानविलकरनं सांगितले खास कनेक्शन

Harshada Khanvilkar Talk On Ganpati Bappa : मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकरने गणपती बाप्पासोबत असलेले आपले खास कनेक्शन सांगितले आहे. तिने आपल्या बाप्पाचे शाहरुख खान नाव ठेवले आहे.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकरची सध्या 'लक्ष्मी निवास' मालिका सुरू आहे.

मिडिया मुलाखतीत हर्षदाने गणपती बाप्पासोबतचं खास कनेक्शन सांगितले आहे.

हर्षदाने गणपती बाप्पाचे नाव शाहरुख ठेवले आहे.

मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar)आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावत आहे. सध्या तिची 'लक्ष्मी निवास' ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मोरंजन करत आहे. अलिकडेच या मालिकेचे 200 भाग पूर्ण झाले आहे. मालिकेचा प्रत्येक भाग मनोरंजनाने भरपूर असतो. मालिकेत हर्षदा खानविलकरने 'लक्ष्मी' हे आईचे पात्र साकारले आहे. सध्या मालिकांमध्ये सण साजरे होताना दिसत आहे. आता लवकरच गणपती देखील येणार आहेत. अशात नुकत्याच झालेल्या एका मिडिया मुलाखतीत हर्षदा खानविलकरने गणपती बाप्पाशी असलेले खास नाते सांगितले आहे.

एका मिडिया मुलाखतीत हर्षदाने गणपती बाप्पाशी असलेले आपले नात सांगताना म्हणाली की, "गणपती बाप्पांबद्दल काय सांगू? त्यांचे आणि माझे अनेक वर्षांपासून अफेअर आहे. गणपती बाप्पा फक्त श्रद्धा स्थान नसून माझं प्रेम आहेत. माझ्या वडिलांचे देखील गणपती बाप्पा प्रेम आहे. देवाची पूजा करताना एक भीती मनात बाळगली जाते. व्यवस्थित सगळं पाळलं जातं. पण माझे असे नाही. गणपती बाप्पा माझा मित्र आहे. सखा आहे. तो माझी नेहमी काळजी घेतो."

पुढे हर्षदा खानविलकर म्हणाली की, "मी माझ्या गणपती बाप्पाला वेगवेगळी नावे ठेवते. माझ्याकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती आहे. मी त्याचे नाव शाहरुख (shah rukh khan) ठेवले आहे. कारण मला शाहरुख खान खूप आवडतो. माझे जास्त प्रेम शाहरुखवर आहे. तसेच सिद्धिविनायक गणपती प्राईम आणि प्रॉपर आहे. त्यामुळे त्याचे नाव आमिर खान असे ठेवले आहे. कारण तो परफेक्शनिस्ट आहे."

हर्षदा खानविलकरच्या शूटिंगवर मेकअप रुममध्ये भगवद् गीता, स्वामींचा फोटो आणि बाप्पाची मूर्ती तिने ठेवली आहे. तिच्या ड्रेसिंग टेबलवर श्रीमंत दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे.

हर्षदा खानविलकर कोणत्या मालिकेत सध्या काम करत आहे?

लक्ष्मी निवास

हर्षदाने गणपती बाप्पाचे नाव काय ठेवले?

शाहरुख

'लक्ष्मी निवास' मालिकेचे किती एपिसोड झाले?

200 पूर्ण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT