प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदमने एका मुलाखतीत रानडुक्कर, घोरपड सारखे प्राणी खाल्ल्याचा दावा केला होता. भारतात बेकायदेशीररित्या वन्यजीवांचे सेवन करणे गुन्हा मानला जातो. यामुळे महाराष्ट्रातील वनविभागाने चौकशीसाठी मुंबईतील एका संस्थेच्या तक्रारीवरून अभिनेत्री छाया कदमला नोटीस धाडली आहे. संस्थेने वनविभागाला तक्रार करत अभिनेत्री छाया कदमवर वन्यजीव खाल्ल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, वनस्पती आणि प्राणी कल्याण संस्थेने वनविभागाकडे तक्रार दिली. छाया कदमने एका मुलाखतीत रानडुक्कर, घोरपड सारखे वन्यजीव खाल्ल्याचा दावा केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. छाया कदमच्या दाव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. छाया कदमने केलेल्या दाव्यावरून तिला वनविभागाने चौकशीसाठी नोटीस धाडली आहे. संस्थेचं म्हणणं आहे की, 'छाया कदमने म्हटलं की, हरण, ससा, रानडुक्कर, साळींदर सारखे संरक्षित वन्यजीव खाल्लं आहेत. मात्र, हे सर्व प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित प्रजाती आहेत'. त्यामुळे संस्थेने वनविभागाकडे तक्रार केली.
छाया कदमने केलेल्या दाव्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी वनविभागाने एका पथक तयार केलं आहे. वनविभागाचं पथक हे मांस मिळवण्यास मदत करणारे शिकारी आणि वन्यजीवांचं मांस पुरवणाऱ्यांचा शोध घेईल. तपास अधिकारी राकेश भोईर म्हणाले की, 'आम्ही अभिनेत्री छाया कदमशी फोनवरून संपर्क साधला. तिने आम्हाला सांगितलं की, व्यावसायिक कामासाठी शहराबाहेर आहे. चार दिवसांनी घरी येणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन चौकशीसाठी हजर होणार आहे'.
भोईर पुढे म्हणाले, 'वन्यजीवांची शिकार करणारे आणि त्यांच्या मांस पुरवठा करणाऱ्या लोकांचा शोध घेण्याचे काम अधिकारी करत आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल'.
छाया कदम ही एक मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. छाया अभिनय, ग्रामीण भाषा आणि हटके डायलॉगसाठी ओळखली जाते. छाया कदमने अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, नाटक आणि वेबसीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.