प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आणि निर्मिती तेजस्विनी पंडीत सध्या कमालीची चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी हातमिळवणी केली आहे. नुकतंच अभिनेत्रीने महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. तेजस्विनी पंडीत आणि वर्धा नाडियाडवाला यांनी 'येक नंबर' नावाच्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. तेजस्विनी पंडीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. (Marathi Actress)
महिला दिनानिमित्त आणि महाशिवरात्रीनिमित्त वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ८ मार्च असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून 'येक नंबर' असे या चित्रपटाचे नाव आहे. 'व्हेंटिलेटर', 'फेरारी की सवारी' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. (Marathi Film)
शेअर केलेल्या पोस्टमध्ये, तेजस्विनी पंडीत आणि वर्धा नाडियादवाला दोघींचाही एकत्रित असून दोघींच्याही हातात क्लॅपिंगची पाटी दिसत आहे. तेजस्विनी पंडीत आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “मित्र-मैत्रिणींनो, जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून “येक नंबर” कारभार जमवलाय, निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे! ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत. दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाणे आणि संगीत अजय-अतुल. आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे! आजपासून “येक नंबर”च्या चित्रीकरणास सुरुवात, गणपती बाप्पा मोरया” (Social Media)
'येक नंबर' अशी प्रेमकथा आहे, जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी 'येक नंबर'चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.