Priya Berde Join BJP: अनेक कलाकार सध्या राजकारणात सक्रीय आहेत. आपल्या अभिनयासोबतच त्यांची राजकारणातील चर्चाही अनेकदा होते. त्यातच आता चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला होता.
जुलै 2020 मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रियंका बेर्डे यांनी अनेक गरजवंतांना मदत केली होती. मात्र 2 वर्षातच प्रिया यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून आज नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यामागील अद्याप त्यांनी कारण स्पष्ट केलेले नाही. २०२० मध्ये प्रिया बेर्डे यांच्याबरोबर अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, सुहासिनी देशपांडे, अभिनेता विनोद खेडेकर, निर्माता संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक सुधीर निकम यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
कोण आहेत प्रिया बेर्डे?
प्रिया बेर्डे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 रोजी झाला होता. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. प्रिया बेर्डे यांनी रंगत संगत, अशी ही बनवा बनवी, एक गाडी बाकी अनाडी, अफालतून, बजरंगाची कमाल, जत्रा यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या त्या पुण्यात लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यांना अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे हे दोन मुलं देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.