Amruta Khanvilkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar : 'चंद्रा'ला चाहत्याने घातली लग्नाची मागणी; अमृता म्हणाली, मी तुझ्यासोबत लग्न...

Amruta Khanvilkar Got Marriage Proposal : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला चाहत्याने लग्नाची मागणी घातली आहे. याला अमृताने एका खास अंदाजात उत्तर दिले आहे. ती नेमकं काय बोली, जाणून घ्या.

Shreya Maskar

मराठमोळी 'चंद्रा' अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) कायमच तिच्या नृत्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर अमृताने अनेक हिट चित्रपट केले आहे. ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. ती मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या अमृताने एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरला तिच्या चाहत्याने चक्क लग्नाची मागणी घातली आहे. या मागणीला अमृताने देखील एका खास अंदाजात उत्तर दिलं आहे. तिने लग्नाची मागणीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तिचे उत्तर लिहून तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

चाहत्याचा मेसेज

चाहत्याने मेसेजमध्ये लिहिलं की," अमृता खानविलकर आय लव्ह यू ...मी तुझ्याशी लग्न करायचे आहे. कायमस्वरूपी तुझा नवरा प्लीज...मी इंडियन सुनील..." खरंच चाहते आपल्या आवडत्या कलाकारांसाठी दिवाने असतात. याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

अमृताचे उत्तर

अमृताने यावर उत्तर देत लिहिलं की, "हॅलो इंडियन सुनील, मला लग्नाची मागणी घातल्याबद्दल खूप आभारी आहे. पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. जरी तुला माझा कायमस्वरूपी नवरा व्हायचे असेल...खरंच सॉरी..." असे लिहून अमृताने हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. अमृताने छान शब्दांत चाहत्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.

amruta khanvilkar

अभिनेत्री अमृता खानविलकरला 'चंद्रा' या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे. अमृताचे इन्स्टाग्राम 3.5 मिलियन फॉलोअर्स आहे. ती इन्स्टाग्राम आपल्या डान्सचे,लूकचे आणि आगामी प्रोजक्ट बद्दल नेहमीच अपडेट देत असते. 2015मध्ये अमृता खानविलकरने अभिनेता हिमांशु मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT