Aali Lakhabai Song Saam tv
मनोरंजन बातम्या

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Aali Lakhabai Song: अमृता धोंगडेच्या अभिनयाने सजलेलं ‘आली लखाबाई’ हे गाणं सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोकसंगीत, दमदार संगीत आणि पारंपरिक सादरीकरणामुळे गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Shruti Vilas Kadam

मराठी संगीतविश्वात लोकसंगीताचा गोडवा आणि आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम घडवणारं ‘आली लखाबाई’ हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून अल्पावधीतच या गाण्याने रसिकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अमृता धोंगडेच्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक नृत्यसादरीकरणाने सजलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकप्रिय संगीतकार हितेश मोडक यांच्या सुरेल संगीताने सजलेल्या या गाण्याला प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासांत हजारो प्रेक्षकांनी हे गाणं पाहिलं असून त्याच्या लोकसंगीतप्रधान धाटणीची विशेष चर्चा होत आहे. ग्रामीण संस्कृतीचा वारसा, पारंपरिक लोककलेचा रंग आणि उत्सवमय वातावरण यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो.

या गाण्यात अमृता धोंगडेने ‘लखाबाई’ हे पात्र साकारलं आहे. तिचा पारंपरिक आणि रांगडा अंदाज, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि नृत्यकौशल्यामुळे गाण्याला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे गाण्यातील तिचा रौद्रावतार आणि पारंपरिक लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. यापूर्वी हितेश मोडक यांच्या ‘राजा राजा’ या गाण्यालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ‘आली लखाबाई’नेही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

या गाण्याची निर्माती आणि प्रमुख अभिनेत्री अमृता धोंगडेने या गाण्याबाबत आपला आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “‘आली लखाबाई’ हे गाणं माझ्यासाठी अत्यंत खास आहे. या गाण्यात अभिनेत्री म्हणून काम करताना निर्माती म्हणूनही स्वतःला सिद्ध करण्याची संधी मला मिळाली. संपूर्ण टीमने प्रत्येक टप्प्यावर खूप मेहनत घेतली असून प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायी आहे.”

गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संपूर्ण टीमने मोठ्या उत्साहाने काम केल्याचेही अमृताने सांगितले. या गाण्यात अभिनेत्री नॉयरिका भतीजा, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि बालकलाकार आरोह धोंगडे यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सचिन कांबळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून गायक सौरभ साळुंखे आणि ईश्वरी बाविस्कर यांच्या आवाजाने गाण्याला आणखी आकर्षक बनवले आहे. गावाकडच्या संस्कृतीचा सुगंध, जोशपूर्ण नृत्य, प्रभावी शब्दरचना आणि संगीताची जादू यांचा सुरेख मिलाफ असलेलं ‘आली लखाबाई’ हे गाणं सध्या संगीतप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

Buttermilk Vs Curd: ताक की दही, उपवासाला कोणता पर्याय फायदेशीर?

Accident: धावत्या कारने डिव्हायडरला धडक देत घेतला पेट, ४ जण जिवंत जळाले

Kidney Stones : किडनी स्टोनचा धोका टाळायचाय? रोज प्या 'इतके' ग्लास पाणी

SCROLL FOR NEXT