marathi actress aai kuthe kay karte serial fame archana patkar break silence on ex daughter in law hemlata bane arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actress Arrested: 'आमच्या कुटुंबाशी तिचा संबंध...'; सुनेच्या अटकेवर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची ठाम प्रतिक्रिया

Marathi Actress Arrested Case: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्या एक्स सुनेला 10 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक झाल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर मौन सोडले.

Shruti Vilas Kadam

Marathi Actress Arrested Case: मुंबईत मनोरंजन विश्वात खळबळ उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीची सुन, अभिनेत्री हेमलता पाटकर (३९) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (३३) यांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने १० कोटी रुपयांच्या खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी या दोघींना पहिला हप्ता 1.5 कोटी स्वीकारताना रंगेहात पकडले असल्याचा तपशील बाहेर आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाशी १४ नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या वादातून सुरू झाले. लेझर लाइटच्या वापरावरून झालेल्या वादानंतर महिलांनी बिल्डरच्या मुलाविरोधात खोट्या विनयभंगाची तक्रार दाखल केली आणि त्यातून मोठ्या रकमेची खंडणी मागितली असा आरोप पोलिसांनी केला आहे. सुरुवातीला १० कोटींची मागणी केली पण नंतर ५.५ कोटी रुपये खंडणीचे ठरले. ही माहिती कळताचं पोलीसांनी सापळा रचून दोघींना अटक केली.

हेमलता पाटकर याचं नाव विशेषतः चर्चेत आलं कारण ती लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची एक्स सून म्हणून ओळखली जात होती. अभिनेत्रीच्या सूनेला कैद या चर्चेने हे प्रकरण अधिक चर्चेत आलं.

यावर प्रतिक्रिया देताना अर्चना पाटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्पष्ट केले की हेमलता आणि त्यांचा कुठलाही कुटुंबीयांचा आता काही संबंध नाही. त्यांनी म्हटले की त्यांच्या मुलाने हेमलताशी अंदाजे चार वर्षांपूर्वी डिव्होर्स घेतला असून त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे कृपया त्यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नये, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

मुंबई पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध खंडणी मागणे, धमकी देणे, ब्लॅकमेल करणे असे गुन्हे दाखल केले असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे मराठी सिने-टीव्ही विश्वात मोठ्याप्रमाणात चर्चा रंगली आहे आणि पुढील चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Corn Cheese Rolls Recipe: 31st पार्टीसाठी बनवा कुरकुरीत 'कॉर्न-चीज रोल्स'; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होतील खुश!

LIC Smart Pension Scheme : एलआयसीची भन्नाट स्कीम, प्रत्येक महिन्याला मिळणार ₹२०,००० पेन्शन; कॅल्क्युलेशन वाचा

Maharashtra Live News Update : नागपुरात राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

7 Things Carry in Bag: पार्टीला जाणाऱ्या प्रत्येक मुलीच्या बॅगेत असायला हव्यात या ७ महत्वाच्या वस्तू

Kalyan : कल्याण–डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात भरले उमेदवारीचे फॉर्म, युतीत जागा वाटपावरून तेरी भी चूप मेरी भी चूप

SCROLL FOR NEXT