Kiran Mane On Satara City Saam TV
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: ‘पण सातारा म्हणजे...’ ‘सातारच्या बच्चन’ने लिहिली खास साताऱ्यासाठी पोस्ट

Chetan Bodke

Kiran Mane On Satara City: मराठी टेलिव्हिजन अभिनेता किरण माने सर्वाधिक आपल्या अभिनयामुळे नाही तर, ठोस निर्णयांमुळे आणि त्याच्या गावरान तडक्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहतो. आपल्या विशेष खेळीने किरण माने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये फारच प्रसिद्ध झाला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात किरणला कोणीही किरण माने म्हणून नाही तर, ‘सातारचा बच्चन’म्हणूनच तो प्रसिद्ध झाला. नुकतंच त्याने साताऱ्याबद्दल एक भली मोठी पोस्ट लिहिलीय. सध्या त्या पोस्टची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

साताऱ्याबद्दल किरण माने म्हणतात, “ लोकं म्हन्त्यात “सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन.”

“खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल, जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे !”

“पण सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो. पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्‍याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत..”

आपल्या पोस्टमध्ये पुढे किरण म्हणतो, “...माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार.. आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनी सोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच.. कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच ! पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्काॅटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !! कधी मन उदास झालं तर माहूलीला कृष्ना-वेन्नेच्या संगमावर जाऊन वहात्या पान्याकडं एकटक बघत बसायचं. मूड फ्रेश असला तर कन्हेर डॅमवर चक्कर मारायची... काय-काय सांगू !”

किरण माने आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणाला, “कधी वरच्या रोडवरनं राजवाड्यावर जाऊन खालच्या रोडवर्न परत पोवई नाक्यावर आलं तर आख्खं सातारा भेटतं... दोस्तलोकं हाक मारत्यात "ऐ किरन्या भावा...लै मोट्टा ॲक्टर झालास.. आमाला इसारला न्हायस ना? ये की घरी रैवारी मटन खायाला.”

“बास. आजून काय पायजे? मुंबै बापासारखी असली तरी सातारा आईसारखी माया करतं माझ्यावर... आपल्या आईला सोडुन कधी कुनी जातं का? म्हनूनच, मुंबैत काम करायला शंभर हत्तींचं बळ देनारा माझा सातारा आपन कधीच सोडनार नाय गड्या...”

किरण मानेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून चर्चेत आला होता. नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रावरंभा’मध्ये देखील किरण मानेने मुख्य भूमिका साकारली होती. त्यातील त्याचे पात्र देखील खूपच चर्चेत आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

Kareena Kapoor: "आई.., मी खरंच इतका फेमस आहे?" तैमूरच्या प्रश्नावर करिनाचं उत्तर ऐकलं का? Video पाहा

SCROLL FOR NEXT