Akshay Kumar OMG 2 Look: कपाळी भस्म, डोक्यावर जटा भगवान शंकराच्या रूपात अक्षयला पाहा,अभिनेत्याने दिली महत्वाची अपडेट...

Akshay Kumar Video: अक्षयसाठी आशेचा किरण असलेल्या ‘ओह माय गॉड २’ मधील अक्षयच्या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Akshay Kumar OMG 2 Look Video
Akshay Kumar OMG 2 Look VideoSaam Tv
Published On

Akshay Kumar OMG 2 Look Video: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. त्याच्या या चित्रपटाचा सिक्वेल या पूर्वी २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या वर्षी त्याचे सर्वच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांचे या चित्रपटावर बरेच लक्ष आहे.

अक्षयसाठी आशेचा किरण असलेल्या ‘ओह माय गॉड २’ मधील अक्षयच्या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अक्षयचा हा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून येत्या ११ जुलै रोजी त्याचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar OMG 2 Look Video
Shreyash Jadhav Award: प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला विशेष पुरस्काराने सन्मानित, पुरस्काराला बॉलिवूड सेलिब्रिटींची ही मांदियाळी

अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षय शंकर भगवानाच्या रूपात दिसत आहे. सध्या अक्षयचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याचा लूक नेटकऱ्यांना आवडला आहे.

व्हिडिओमध्ये अक्षय कुमार गर्दीतून समोर येत असून मागील लोक हर हर महादेवचा जयघोष करत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षयचा लूक डोक्यावर जटा, कपाळावर भस्म, गळ्यात नील आणि रुद्राक्षाची माळ घातलेला लूक दिसत आहे. अक्षय कुमारचा हा बाबा भोलेनाथसारखा लूक नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंदीस आलाय.

Akshay Kumar OMG 2 Look Video
Shahid Kapoor Kissing Photos Leaked: शाहिद आणि करीनाचे ५०० रुपयांसाठी ‘नको ते’ फोटो झाले होते लीक; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन दिले की, ११ जुलै रोजी ‘ओह माय गॉड २’ चा टीझर प्रदर्शित होणार आहे. तर ११ ऑगस्ट रोजी ‘ओह माय गॉड २’ थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा टीझर ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून सर्वांचीच आता चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

१ मिनिट ३४ सेकंदाच्या या व्हिडिओत अक्षयच्या लूकचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. चित्रपटात अक्षय कुमार आमि यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार असून अक्षय भगवान शंकराच्या तर यामी गौतम वकिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे तर, अक्षयचा या वर्षातील पहिला चित्रपट ‘सेल्फी’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला होता. त्यानंतर त्याचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबत येत्या काही दिवसातच अक्षय ‘सौराराई पोत्रु’ या डब केलेल्या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर देखील दिसणार आहे. त्या चित्रपटाचे नाव ‘बडे मिया छोटे मिया’ असे आहे. तर अक्षय बहुचर्चित ‘हेरा फेरी ३’मध्ये देखील दिसणार आहे. अद्याप चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com