Vaibhav Tatvawadi And Pooja Sawant Relation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vaibhav Tatwawadi: ‘तू पूजा सावंतला डेट करतोय?’ या प्रश्नावर वैभवने केला महत्वाचा खुलासा

सध्या वैभवच्या रिलेशनची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत त्याने अफेअरबद्दल भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Vaibhav Tatvawadi And Pooja Sawant Relation: मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूडमध्ये वैभव तत्ववादीने आपल्या अभिनयाचा ठसा सर्वत्र उमटवला. मराठी आणि बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारत आपले नशीब आजमावले. मराठी मध्ये ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘भेटली तू पुन्हा’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली तर, हिंदी सिनेसृष्टीत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘मणिकर्णिका’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. अशातच सध्या वैभवच्या रिलेशनची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकताच त्याने एका मुलाखतीत त्याने अफेअरबद्दल भाष्य केले आहे.

नुकताच वैभव त्याच्या आगामी ‘सर्किट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. वैभवचे अनेकदा काही अभिनेत्रींसोबत नाव जोडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रार्थना बेहरे सोबत तर आता पूजा सावंत त्याचं नाव जोडलं जात आहे. वैभवची जोडी या दोन्ही ही अभिनेत्रींसोबत खूप छान दिसत होती. नुकतंच वैभवने ‘लोकमत फिल्मी’ ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या अफेरवर चर्चा केली आहे.

यावेळी मुलाखती दरम्यान वैभवला प्रार्थना आणि पूजाबद्दल एक प्रश्न विचारला. त्याला, “तुझं मराठी सिनेसृष्टीतल्या काही अभिनेत्रींसोबत नाव जोडलं होत. त्यामध्ये प्रार्थना आणि पुजासोबत रिलेशनच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. तर ह्या चर्चा खऱ्या आहेत की खोट्या?” यावर वैभव म्हणतो, “आमच्यामध्ये तसं काही नाही. आम्ही फक्त एक खूप चांगले मित्र आहेत आणि आहोत.”

वैभवच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, नुकतच वैभव आणि हृता हे दोघेही ‘सर्किट’ चित्रपटात एकत्र झळकले होते. मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपट गेल्या ७ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

Chanakya Niti : एखाद्याचं हृदय जिंकायचंय? वाचा चाणक्यांची ही 4 गुपितं

SCROLL FOR NEXT