Alia-Ranbir Anniversary Celebration: आलिया- रणबीर पापाराझींसमोरच झाले रोमँटिक; व्हिडीओ पाहून चाहते झाले चूर, व्हिडीओ व्हायरल

Ranbir-Alia Romantic Video: आलियाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
Ranbir-Alia Become Romantic In front of Paparazzi
Ranbir-Alia Become Romantic In front of PaparazziSaam Tv

Alia-Ranbir Viral Video: आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल आहे. त्यांच्या जोडीचे नेहमीच सगळेजण कौतुक करतात. काल आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आलियाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

आलिया आणि रणबीर यान लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पापाराझींनी त्यांना गाठलं. त्यानंतरचा त्यांचा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया रणबीरला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया कारमध्ये बसलेले दिसत आहेत. तर पापाराझी त्यांना पोज देण्यास सांगत आहेत.

Ranbir-Alia Become Romantic In front of Paparazzi
Baloch Teaser: 'पानिपत ही मराठयांची शेवटची लढाई नव्हती' मराठ्यांच्या 'बलोच'च्या विजयाची गाथा सांगणारा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

आलियाने रणबीरला पकडलेले असते. तर रणबीर पापाराझींशी हात मिळवत असतो. आलिया रणबीरला किस करते. पापाराझीं त्यांना कॅन्डीड पोज द्यायला सांगतात. तेव्हा रणबीर म्हणतो हे कॅन्डीडचा हाये. त्याच्या या बोलण्यावर आलिया हसते. व्हिडिओमध्ये आलिया खूप आनंदी आहे. दोघांची जोडी छान दिसतेय.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलिया आणि रणबीर त्यांच्या नवीन घरात सुरू असलेले काम पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्या या घरात काम बरेच दिवस सुरू आहे. या कामाची पाहणी करायला दोघेजण अनेकदा जात असतात.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होत असताना आलियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला. पहिला फोटो दोघांच्या हळदी समारंभाचा आहे. त्याचबरोबर इतर फोटोंमध्ये दोघांच्या खास क्षण आहेत. हे फोटो शेअर करत आलियाने कॅप्शन दिले, "आनंदी दिवस."

नीतू कपूर यांनी देखील लेक आणि सुनेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया रणबेरचे फोटो शेअर करत नीतू कपूर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच ऋषी कपूर यांची आठवण देखील काढली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com