Mi Punha Yein Memes Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mi Punha Yein Memes: राज्यातील राजकीय भूकंपावरून ‘मी पुन्हा येईन’ प्रकाशझोतात, मीम्स व्हायरल

Mi Punha Yein Memes Viral Video: एकंदरच हे गरमागरमीचे वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजची आठवण करून देत आहे.

Chetan Bodke

Me Punha Yein Web Series On Maharashtra Politics: गेल्या रविवारी अजित पवार यांनी मोठं राजकीय बंड करत शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांना ३० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. बरोबर एक वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय सत्तानाट्य घडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभरानंतर मोठं राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला आहे. एकंदरच हे गरमागरमीचे वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजची आठवण करून देत आहे.

साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या बेवसीरिजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यातील डायलॅाग्जही भरपूर गाजले. राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळाल्या.

नुकतंच वेबसीरिज मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते उपेंद्र लिमये यांनी एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओत उपेंद्र लिमयेंनी चाहत्यांसोबत वेबसीरिजमधील एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. सद्य स्थितीवर आधारित जोक्स, मिम्स सर्वत्र व्हायरल होत असतानाच या सीरिजमधील काही व्हिडीओज, डायलॅाग्जचे मिम्सही सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना ही सीरिज पाहाण्याची उत्सुकता वाढली आहे. (OTT)

ही वेबसीरिज सध्य स्थितीशी कशी साधर्म्य साधणारी आहे, यातील प्रत्येक कलाकार आपल्याला कोणाची ओळख करून देतो याबद्दलचे अनेक मिम्स सध्या सर्वत्र शेअर होत आहेत. परिणामी, तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेक्षकांचे मनोरंजनही होत आहे.

या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, रूचिता जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

SCROLL FOR NEXT