Siddharth Jadhav Bhalbharti Movie Got Award Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवची आणखी एका पुरस्काराला गवसणी; बालभारती चित्रपटासाठी मिळाला बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड

Siddharth Jadhav Bhalbharti Movie Got Award: सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थ जाधवच्या बालभारती चित्रपटासाठी दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये अवॉर्ड मिळाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोपकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थ हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकंत असतो. सिद्धार्थ जाधव कॉमेडी, विनम्र, भावनिक अशा सर्व प्रकारच्या भूमिका उत्तमरितीने पार पाडतो.त्याच्या कामाचे संपूर्ण देशभरात कौतुक केले जाते. सिद्धार्थच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिद्धार्थ जाधवला नुकताच 'बालभारती' चित्रपटासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.

दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये बेस्ट अॅक्टर (ज्यूरी ) हे अवॉर्ड देण्यात आले आहे. सिद्धार्थने हे अवॉर्ड मिळाल्यानंतर प्रेक्षकांचे आभार मानले आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर अवॉर्डचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सिद्धार्थने खास कॅप्शन दिले आहे.

'बेस्ट अॅक्टर (ज्युरी)बालभारती, नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024" मध्ये आमचा सिनेमा "बालभारती".यासाठी मला जुरीचं "बेस्ट ऍक्टर" हे अवॉर्ड मिळालं. मनापासून आनंद होतो "बालभारती" सिनेमातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर ऍप्रिसिएट केला जातय.काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे.देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे .आमचे सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो', असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे.

सिद्धार्थ जाधवच्या बालभारती चित्रपटात अभिजित खांडकेकर, संजय मोने, नंदिता धुरी हे कलाकारा मुख्य भूमिकेत आहेत. एका मुलाची शाळा बदलल्यामुळे त्याला येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी हा मुलगा काय करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport : मोठी बातमी! ८ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता | VIDEO

Malanggad Fort History: निसर्ग, पर्यटन आणि ऐतिहासिक मलंगगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Ratnagiri : मंदिरातून सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले; रत्नागिरीत श्रीराम मंदिरात चोरी

Pune : पुणेकरांना आता मेट्रोने विमानतळापर्यंत प्रवास करता येणार, मेट्रो विस्ताराच्या कामाला सुरूवात

शेतकर्‍यांसाठी तिजोरी उघडली, पूरग्रस्तांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT