Mitali Mayekar And Siddharth Chandekar Buy Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mitali Mayekar आणि Siddharth Chandekar च्या घरी लक्ष्मीचं आगमन, व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक

Mitali Mayekar And Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकरच्या आयुष्यामध्ये नवा पाहुणा आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही गुड न्यूज शेअर केली.

Priya More

Mitali Mayekar And Siddharth Chandekar Buy Car:

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) त्याच्या आगामी 'झिम्मा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिद्धार्थ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकरच्या (Mitali Mayekar) आयुष्यामध्ये नवा पाहुणा आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही गुड न्यूज शेअर केली आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्याची झलक देखील दाखवली.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. हे कपल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना त्यांच्या नव्या प्रोजक्टबद्दल आणि त्याच्या पर्सनल लाइफबद्दल अपडेट्स देत असतात. नुकताच या कपलने आलिशान कार खरेदी केली. दोघांनी देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या नव्या कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.

सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या इन्स्टावर पोस्ट करत आपल्या नवीकोरी कारची झलक दाखवली आहे. या कपलने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर KIA Seltos ही आलिशान कार खरेदी केली आहे. सिद्धार्थने इन्स्टावर कारचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'एकत्र मोठे होतोय, एकत्र खरेदी केलेली पहिली कार. बायको तुझा अभिमान आहे. दिवाळीच्या शुभेच्छा.' तर दुसरीकडे मितालीने देखील इन्स्टावर कारसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने 'माझी लक्ष्मी आली' असे लिहिले आहे.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवा पाहुणा घरी आल्यामुळे मिताली आणि सिद्धार्थ दोघेही खूप आनंदी झाले आहेत. मिताली आणि सिद्धार्थचे नवीन कारसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्याही पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुमचा अभिमान वाटतो आहे' अशा प्रकारच्या कमेंट चाहत्यांनी आणि इतर सेलिब्रिटींनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT