बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Movie) नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला यावर मत व्यक्त करत आहेत. अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडला असून ते चित्रपट पाहण्याचे आवाहन करत आहेत. अशामध्ये आता या चित्रपटाबाबत मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे यांनी पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
शरद पोंक्षे हे नेहमी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. ते नेहमी स्पष्टपणे आणि रोखठोकपणे आपली मत मांडत असतात. शरद पोंक्षे यांना सावरकरवादी म्हटले जाते. ते नेहमीच यावर त्यांचे विचार मांडत असतात. नुकताच त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यानी या पोस्टमध्ये रणदीप हुड्डाच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टद्वारे त्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचे सांगितले आहे. चित्रपट न पाहण्यामागचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे.
शरद पोंक्षे यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'प्रत्येकाने पहायला हवा. मी दुसऱ्या सिनेमात व्यस्त आहे. म्हणून मला अजून बघणं जमलं नाही. पुढील दोन दिवसांत मी बघून एक छान व्हिडिओ करून प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण खूप लोक मला विचारताहेत की तुम्ही चित्रपटाबद्दल काही का बोलला नाहीत तर सिनेमा अधिक बघावा आणि मग सविस्तर त्यावर बोलावं असं ठरवलेलं आहे. पुढील चार दिवसांत माझा व्हिडिओ येईलच.', असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. आता शरद पोंक्षे यांचे चाहते त्यांच्या या व्हिडीओची वाट पाहत आहेत.
'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याने स्वातंत्र्यवीर सावरकारांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिने या चित्रपटामध्ये सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २२ मार्चला रिलीज झाला. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने अभिनयासोबत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. त्याचसोबत या चित्रपटाचा सह-लेखन आणि सह-निर्मिती देखील त्याने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.