Indrayani Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Indrayani Promo Video : 'इंद्रायणी' मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार अनोख्या भूमिकेत

Indrayani Promo Released : अभिनेता संतोष जुवेकर 'इंद्रायणी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंद्रायणी' मालिकेमध्ये संतोष जुवेकर पाठिराखा ही भूमिका साकारणार आहे.

Chetan Bodke

'स्ट्रगलर साला' वेबसीरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेला अभिनेता संतोष जुवेकर लवकरच एका मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये, मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून अभिनेता संतोष जुवेकरने प्रसिद्धी मिळवली आहे. लवकरच अभिनेता संतोष जुवेकर 'इंद्रायणी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंद्रायणी' मालिकेमध्ये संतोष जुवेकर पाठिराखा ही भूमिका साकारणार आहे.

नुकताच मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, संजीवनीला आणण्यासाठी इंदूला आळंदीत जायचं असतं. पण तिची ती शेवटची बस चुकते म्हणून ती नाराज होते. “शेवटची बस गेली. आता आळंदीला कसं जाणार? संजीवनीला कसं आणणार?” असा प्रश्न ती विचारते. तेवढ्यात एक मागून आवाज येतो. इंदूच्या मदतीला तिचा पाठिराखा येतो. “अशी कशी जाईल तुम्हाला सोडून बस. रामकृष्ण हरी” असं म्हणत तो मालिकेत एन्ट्री घेतो. मालिकेमध्ये पाठिराखाचे पात्र अभिनेता संतोष जुवेकर साकारणार आहे.

मालिकेमध्ये अभिनेता वारकरीच्या वेशात दिसत आहे. खूप दिवसानंतर संतोषला नव्या प्रोजेक्टमध्ये पाहून चाहते आनंदित झाले आहेत. 'इंद्रायणी' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी लागली आहे. लाडक्या व्यंकू महाराजांना वाचवण्यासाठी इंदू आळंदीत संजीवनीच्या शोधात जाते.

इंदूसाठी हा प्रवास खूपच खडतर असणार आहे. पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सर्व प्रवासात तिच्यासोबत पाठीराखाही असणार आहे. हे दोघे मिळून प्रवास कसा पार पाडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सलग सुट्ट्यांच्या आनंदात सुस्साट 'सुटले'; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कोंडीत अडकले, VIDEO

Beed News : बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बालविवाह, बनावट आधारकार्डवर छापली खोटी जन्मतारीख; पोलिसांनी उधळला डाव

Maharashtra Live News Update: तालुक्यासाठी अधिकचा निधी आणायचा असेल तर नावही बदली करावे लागते, आमदार मांडेकर यांचे वक्तव्य

Skin Care: रात्री केलेल्या या ३ चुकांमुळे तुमचा चेहरा हळूहळू डल आणि वयस्कर होतो

Crime News: तब्बल 400 कोटी रुपये असलेले दोन कंटेनर चोरीला; कर्नाटकातील चोरीचं नाशिक कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT