सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम साथ साथ है' चित्रपट आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत बॉलिवूडमधील अनेक तगडी स्टारकास्ट आहे. सैफ अली खानही चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असून त्याच्या ह्या चित्रपटाचा सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांमध्ये समावेश होतो. एका जुन्या मुलाखतीत दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सैफ अली खानचा एक किस्सा सांगितला. सध्या सोशल मीडियावर हा किस्सा कमालीचा चर्चेत आला आहे.
एका जुन्या मुलाखतीत दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सांगितले की, "सैफ अली खानच्या खासगी आयुष्यात 'हम साथ साथ है'च्या शुटिंगवेळी खूप चढ उतार होते. त्यामुळे तो कायमच टेंशनमध्येच राहायचा. चित्रपटातील 'सुनो जी दुल्हन' या गाण्याच्या वेळचा किस्सा आहे. सैफ अली खान या गाण्याच्या शुटिंगवेळी अनेक रिटेक घेत होता. कारण तो रात्रभर झोपत नव्हता, चित्रपटातील व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने कशी पद्धतीने साकारता येईल, याचा विचार करत बसायचा. हा सर्व प्रकार मला जेव्हा त्याची पहिली पत्नी अमृतासोबत बोललो तेव्हा मला हे कळलं."
दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, " तो रात्रभर झोपत नसल्यामुळे अमृताला एक सल्ला दिला. अमृताला सैफच्या नकळत त्याला झोपेच्या गोळ्या देण्याचा सल्ला दिला होता. तर तिने त्याला त्याच्या नकळत झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे त्याचे दुसऱ्या दिवशी अनेक सीन्स व्यवस्थित झाले. त्याने ते गाणं एकाच टेकमध्ये एकदम चांगला शॉट दिला. त्याने अगदी व्यवस्थित शॉट दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला."
१९९९ मध्ये रिलीज झालेल्या 'हम साथ साथ है' चित्रपटामध्ये सलमान खान, सैफ अली खान, रिमा लागू, अलोक नाथ, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, तब्बू, मोहनिश बहल यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे कौटुंबिक कथानक असून एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पडलेली फूट आणि तरीही तिनही भावांमध्ये राहिलेली एकजूट यावर आधारित याचे कथानक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.