Navra Maza Navsacha 2 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navra Maza Navsacha 2: नॉनस्टॉप कॉमेडी एक्स्प्रेसच्या प्रवासाला सुरूवात, 'नवरा माझा नवसाचा २'चा धमाकेदार टीझर आऊट

Navra Maza Navsacha 2 Teaser Out: 'नवरा माझा नवसाचा २'ची (Navra Maza Navsacha 2) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबतचे एकएक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Priya More

मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' या सुपरहिट चित्रपट चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २'ची (Navra Maza Navsacha 2) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबतचे एकएक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे आणि अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या मुलगी आणि जावई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. या टीझरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून त्याला चांगली पसंती मिळत आहे. या चित्रपटच्या टीझरमधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत.

सचिन पिळगांवकर, स्वप्निल जोशी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षक पोट धरून हासत आहेत. टीझर पाहूनच प्रेक्षकांचे ऐवढे मनोरंजन होत असेल तर चित्रपट किती कमाल असेल याचा अंदाज लावता येत आहे. १९ वर्षांनंतर 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. त्यामुळे पहिल्या चित्रपटाप्रमाणे त्याचा सिक्वेल देखील प्रेक्षकांना खळखळवून हसवेल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करत आहेत. टीझरनंतर आता प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे २० सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shamrao Ashtekar : माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन, शरद पवारांचा निष्ठावंत सहकारी हरपला

Thursday Horoscope : अडचणीत सापडण्याची शक्यता, वेळेला हात द्यायला कोणी येणार नाही; तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Maharashtra Live News Update : रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात, कांदिवली-बोरिवीलीदरम्यान घडली घटना

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Talasari Tourism: मुंबईच्या गोंगाटातून फक्त २ तासांत पोहोचा थेट निसर्गाच्या मिठीत; स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT