Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh: रितेश देशमुखला मिळाला महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक पुरस्कार, 'या' व्यक्तीमुळे मिळाला सन्मान; म्हणाला...

Maharashtracha Favorite Kon Award : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. ऐवढंच नाही तर चित्रपटाने भरघोस कमाई देखील केली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांचा फेव्हरेट ठरत आहे.

Priya More

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Video:

मराठमोळा अभिनेता आणि बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या चर्चेत आला आहे. रितेश देशमुख आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकतो. पण अभिनेत्यासोबतच रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आणि त्याचा पहिलाच मराठी चित्रपट वेड सुपरहिट ठरला. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. ऐवढंच नाही तर चित्रपटाने भरघोस कमाई देखील केली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांचा फेव्हरेट ठरत आहे. अशामध्ये नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात वेड चित्रपटाच्याच नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया देशमुखसोबत हजेरी लावली. यावेळी रितेशने ब्लँक कलरचा सूट परिधान केला होता. तर जेनेलियाने रेड कलरची साडी नेसली होती. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकट्या ‘वेड’ चित्रपटाने एक दोन नाही तर तब्बल ९ पुरस्कार आपल्या नावावर केले. वेड या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले. त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. महत्वाचे म्हणेज या चित्रपटाच्या माध्यमातून जेनेलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

अशामध्ये ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यामध्ये रितेश देशमुखला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देत गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना रितेश देशमुखने त्याची पत्नी जेनेलियाचे कौतुक केले त्याचसोबत त्याने या पुरस्कारचे सर्व श्रेय आपल्या पत्नीच्या नावावर केले आहे. त्याने यावेळी सांगितले की, 'पहिली व्यक्ती जिने मला, मी दिग्दर्शक होऊ शकतो असं सांगितलं. ती म्हणजे माझी बायको जेनेलिया. त्यामुळे माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिला पुरस्कार जेनेलिया फक्त तुमच्यासाठी' त्यानंतर जेनेलिया रितेशला मिठी मारतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पुरस्कार सोहळ्यामुळे वेड चित्रपटाचाच बोलबाला पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये वेड चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रितेश देशमुख, सर्वोत्कृष्ट अभिनेता- रितेश देशमुख, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेनेलिया देशमुख, सर्वोत्कृष्ट गाणं - सुखं कळले, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा - जेनेलिया, स्टाईल आयकॉन ऑफ द इयर - रितेश देशमुख हे ९ पुरस्कार आपल्या नावावर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT