Nana Patekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: 'माझा मतदारसंघ फायनल झाला की...', निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर नाना पाटेकर स्पष्टच बोलले

Nana Patekar On Loksabha Election : लोकसभा निवडणूकीबाबत आणि अजित पवार गटाकडून उमेदवारीबाबत नाना पाटकेर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत नाना पाटेकर यांनी सूचक वक्तव्य केले.

Priya More

Loksabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. कोणत्या मतदार संघातून कोणत्या उमेदवाराला उभं करायचं याचा आढावा सध्या राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे. अशामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूरमधून (Shirur) पाडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अमोल कोल्हेंविरोधात (Amol Kolhe) अजित पवार कोणाला उभं करणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

यातच अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. लोकसभा निवडणूकीबाबत आणि अजित पवार गटाकडून उमेदवारीबाबत नाना पाटकेर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत नाना पाटेकर यांनी सूचक वक्तव्य केले.

आज सह्याद्री अथितीगृहावर नाना पाटेकर (Nana Patekar), मकरंद अनासपुरे (Makranad Anaspure) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भेटीचे कारण विचारले असता त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून यंदा राज्यभरात गाळ काढण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी राज्य सरकारशी एमओयू करण्यासाठी आल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.

अशामध्ये नाना पाटेकर यांना पत्रकारांनी शिरूरमधून खासदार अमोल कोल्हेंविरोधात तुमच्या नावाची चर्चा होत असल्याचा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, 'राजकारण हा माझा प्रांत नाही. तसंच, दररोज मी कुठून तरी निवडणूक लढवणार असल्याचे पुढे येत आहे. माझा मतदारसंघ फायनल झाला की मला कळवा.' तसंच, कुणाचीही ऑफर स्वीकारून मी निवडणूक लढणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

नाना पाटेकर यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांसाठी जे काम करतोय त्यातून समाधान मिळतंय. राजकारणात गेल्यावर हे काम करता येणार नाही आणि समाधानही मिळणार नाही. मी स्पष्ट बोलणारा आहे. मनात आलेले आपण पटकन बोलून टाकतो. त्यामुळे राजकारणात माझा स्वभाव कुणाला पटेल याची खात्री नाही. त्यामुळे ते मला तिकडे कितपत टिकू देतील.' अशी शंका देखील नाना पाटेकरांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT