Makrand Anaspure  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Makrand Anaspure: जाहिराती मिळाल्या नाही तर तुम्ही गरीब होणार नाही, मकरंद अनासपुरेंनी कलाकारांचे टोचले कान

हिंदी अभिनेत्यांनी पानमसाला आणि गुटख्याच्या जाहिरात करणे तात्काळ थांबवावे त्यांना दोन पैसे मिळाले तरीही त्यांचे काही गरीब होणार नाही असा सल्ला अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: सेलिब्रिटी अनेक जाहिरातींमधून विविध ब्रॅंड्सचं प्रमोशन करतान दिसतात. एखाद्या कलाकाराने जाहिरात केली तर ब्रॅण्डला फायदा नक्की होतो.(Bollywood) (Bollywood Actor) कलाकार जेव्हा एखादी जाहिरात करतात तेव्हा प्रेक्षक त्या ब्रॅण्डविषयी खात्रीशीर राहतात. परंतु असे काही ब्रँड किंवा पदार्थ आहेत ज्यांची जाहिरात कलाकार करत असेल तरी त्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे (Marathi Actors) यांनी औरंगाबाद शहरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या कार्यक्रमात कलाकारांचे कान टोचले.

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी पान मसाला आणि गुटखा यांसारख्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करत त्या गोष्टींना प्रोत्साहन देतात. त्यामुळे त्यांनी या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे. या जाहिराती जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही गरीब होणार नाहीत असेही ते बोलले. आपल्या सोबतच सामान्य व्यक्तींचाही विचार करावा.

बरेच व्यक्ती कलाकारांना पाहत प्रेरित होतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या जाहिराती थांबवाव्यात असा सल्ला जेष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी कलाकारांना दिला आहे. मकरंद अनासपुरे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या कामामुळे चाहत्यांसह सिनेविश्वातील बरेच कलाकार प्रेरित होतील. यावेळी वर्ल्ड हॉस्पिटल आणि पॉलिएटिव्ह केअर डे च्या निमित्ताने एका कॅन्सर रुग्णालयातील कार्यक्रमात असताना प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT