Marathi Actor Madhav Vaze Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actor Passed Away: मराठमोळे अभिनेते काळाच्या पडद्याआड; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Marathi Actor Madhav Vaze Passed Away: ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि प्राध्यापक यांचे आज, ७ मे २०२५ रोजी पुण्यात निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. १९५३ सालापासून त्यांनी अभिनय करकिर्दीची सुरुवात केली.

Shruti Vilas Kadam

Marathi Actor Passed Away: ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि प्राध्यापक माधव वझे यांचे आज, ७ मे २०२५ रोजी पुण्यात निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. १९५३ साली प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून 'श्याम'ची भूमिका साकारली होती, या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या मनात अजरामर झाले. या भूमिकेमुळेच त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख मिळाली.

माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'श्यामची आई' या चित्रपटातून केली. यानंतर त्यांनी 'बापजन्म', '३ इडियट्स', 'डिअर जिंदगी' आणि 'छप्पर फाड के' यांसारख्या हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला. '३ इडियट्स' चित्रपटात त्यांनी जॉय लोबोच्या वडिलांची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. तसेच, त्यांनी २०१३ साली पार्शुराम देशपांडे यांच्या भाषांतरित 'हॅम्लेट' नाटकाचे दिग्दर्शन केले होते.

अभिनयासोबतच माधव वझे शिक्षण क्षेत्रातही सक्रिय होते. पुण्यातील नवरोजी वाडिया महाविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते निवृत्तीनंतरही रंगभूमीशी जोडलेले राहिले. त्यांनी 'प्रायोगिक रंगभूमी', 'रंगमुद्रा', 'श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी' आणि 'नंदनवन' यांसारखी पुस्तके लिहिली आहेत, जी मराठी रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाची ठरली आहेत.

माधव वझे यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. त्यांच्या स्मृती प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव कायम आदराने घेतले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT