Sunny Trailer  Instagram/ @lalit.prabhakar
मनोरंजन बातम्या

Sunny Trailer: लांब गेल्यावरच जवळचं सापडतं, आत्मनिर्भर होणाऱ्या 'सनी'चा ट्रेलर प्रदर्शित

कूल, बिनधास्त, स्वच्छंदी, आपल्या दुनियेतच आयुष्य जगणारा 'सनी' जेव्हा शिक्षणासाठी घरापासून लांब सातासमुद्रापार परदेशात जातो, तेव्हा त्याची आत्मनिर्भर होण्यासाठीची धडपड यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Latest Marathi Movie: 'झिम्मा' चित्रपटाला मिळालेल्या दमदार आणि भरघोस यशानंतर 'झिम्मा'ची संपूर्ण टीम प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि खास चित्रपट घेऊन येत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून नुकताच त्याचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. विविध भावनांनी भरलेला हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना 'सनी'ची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटातील काही पात्रे सुद्धा प्रेक्षकांच्या समोर आले होते तर गाण्यांना ही सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला एकंदरित ट्रेलर पाहिल्यावर कळते की, कूल, बिनधास्त, स्वच्छंदी, आपल्या दुनियेतच आयुष्य जगणारा 'सनी' जेव्हा शिक्षणासाठी घरापासून लांब सातासमुद्रापार परदेशात जातो, तेव्हा त्या ट्रेलरमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठीची धडपड यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

सुखवस्तू घरातून आलेल्या 'सनी'ला परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेताना त्रास होत आहे. प्रत्येक गोष्टीला कसे सामोरे जायचे हे कळतानाच आपल्या घरच्यांचे महत्व यावेळी कळते. लांब गेल्यावरच जवळचं सापडतं, हा अनुभव 'सनी'ला घरच्यांपासून लांब गेल्यावरच येत असल्याचे दिसते. 'सनी'ने अशी कोणती चूक केली, ज्याची त्याला अशी शिक्षा भोगावी लागत आहे, 'सनी'च्या मनातली तगमग नेमकी कसली आहे, सनी पुन्हा मायदेशी येणार की परदेशातच राहणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहेत.

'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, "लांब गेल्यावरच काही गोष्टींची किंमत कळते, जाणीव होते आणि याच अनुभवातून माणूस सर्वार्थाने प्रगल्भ होतो. 'सनी'चा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. मी स्वतः शिक्षणासाठी परदेशात असल्याने ही कथा माझ्या खूप जवळची आहे. खरंतर कधीतरी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. प्रत्येकाने कुटुंबासोबत पाहावा, असा 'सनी' चित्रपट आहे.

सोबतच पुढे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो, "आयुष्यातील गांभीर्य जाणून न घेता, बिनधास्त जगणाऱ्या 'सनी'ला परदेशात गेल्यावर आयुष्याची, नात्यांची किंमत कळते. विनोदी, धमाल आणि तरीही भावनिक असा हा चित्रपट आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी 'झिम्मा'वर प्रेम केले तसेच प्रेम प्रेक्षक 'सनी'वरही करतील, याची मला खात्री आहे.''

ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी'चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT