प्रियांका चोप्रा नुकतीच भारतात आली आहे. ब्युटी ब्रँडच्या प्रमोशनच्या संदर्भात ती वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. तसेच, ती खूप दिवसांनी भारतात आल्याने आनंदी आहे आणि जुन्या मित्रांनाही भेटत आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रियंकाचे चाहते प्रियंकाच्या बॉलिवूड चित्रपटाची वाट पाहत आहेत. ती लवकरच 'जी ले जरा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. प्रियंका सोबत चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट ही एकत्र दिसणार आहेत.
तिने अलीकडेच चित्रपट आणि बॉलीवूडच्या ट्रेंडबद्दल काही वक्तव्य केले आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटातून प्रियंका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर अंतिम काम सुरू असून लवकरच त्यावर काम सुरू होणार आहे. कतरिना आणि आलियासोबत प्रियंका पहिल्यांदाच काम करणार आहे.
प्रियंका चोप्राने अलीकडेच एका वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यादरम्यान ती म्हणते, 'मी माझ्या कारकिर्दीत बराच वेळ फक्त दुय्यम भूमिका साकारण्यात घालवला. मी माझ्या कारकिर्दीत बराच काळ घालवला आहे जिथे स्त्रियानेहमी पुरुषांपेक्षा दुय्यम आहेत.
चित्रपटाचे चित्रीकरण कुठे करायचे आहे, कोणाला कास्ट करायचे आहे आणि काय चालले आहे, हे सर्व निर्णय अभिनेते घेत होते.ज्या काळात पुरुषप्रधान संस्कृती नष्ट होत, महिलांचे वर्चस्व अधिक होत आहे. जिथे स्त्रिया स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्यास स्वत: ठाम असतात.
अशा परिस्थितीत आता चित्रपटांबद्दल आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. फरहान अख्तर 'जी ले जरा' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणात प्रियांकाने असेही सांगितले की, प्रियांकाच्या 'झीर ले जरा' या चित्रपटाबाबत काही शंका होत्या आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी तिने आलिया आणि कतरिनाशी संवाद साधला. प्रियांका चोप्राने सांगितले, दिग्दर्शक फरहान अख्तरच्या आधी आलिया आणि कतरिनाशी संवाद साधला होता.
सध्याच्या पिढीतील नायिकांनी आगामी पिढीतील महिलांना सशक्त कथानक असलेले चित्रपट बनवण्याचा मार्ग सुखकर केला आहे, असे प्रियांका चोप्राचे मत आहे. पुढे ती म्हणते, 'माझ्या पिढीतील नायिकांनी पुढच्या पिढीसाठी परखड मते उघडण्यासाठी दरवाजे उघडले आहेत.
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा आणि सोबतच एक वेगळा चित्रपट बनवण्यासाठी मला माझ्या मित्र- मैत्रिणींना सोबत घ्यायचा होता. पुढच्या वर्षी आम्ही 'जी ले जरा'चे शूटिंग सुरू करू अशी आशा आहे.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.