Kiran Mane Emotional Post Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss च्या घरातील प्रवेशाला १ वर्ष पूर्ण, Kiran Mane यांची भावुक पोस्ट चर्चेत; म्हणाले - '...अजूनबी विश्वास बसत नाय '

Kiran Mane Emotional Post: किरण माने यांनी बिस बॉसच्या घरातील आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Priya More

Kiran Mane Insta Post Viral:

मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असणारे किरण माने हे प्रत्येक वेळी नवनवीन विषय, आयुष्यातील घडामोडी, अनुभव त्याचसोबत एखादा चित्रपट असो वा एखाद्या मालिकेतील पात्र यावर मनमोकळेपणाने आपले मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर ते नेहमीच व्यक्त होत असतात. महत्वाचे म्हणजे किरण मानेंच्या चाहत्यांना देखील त्यांच्या या पोस्ट प्रचंड आवडतात. अशामध्ये किरण माने यांनी बिस बॉसच्या घरातील आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने हे बिग बॉसमुळेच घराघरामध्ये पोहचले. बिग बॉसच्या घरातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. १ ऑक्टोबर २०२२ ला त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला होता. किरण माने बिग बॉसच्या घरामध्ये १०० दिवस राहिले. आज एक वर्षे पूर्ण झाले आहे. याच निमित्ताने किरण माने यांनी स्पेशल पोस्ट करत बिग बॉसच्या घरात त्यांना आलेला अनुभव, ते नेमकं काय शिकले हे सांगितले आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी बिग बॉसचे आभार देखील मानले आहे.

किरण माने यांनी बिग बॉसच्या घरातील त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बिग बॉस त्यांच्याशी बोलताना दिसत असून किरण माने हे रडताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर त्यांचे चाहते देखील दिसत आहेत जे किरण माने यांना प्रोत्साहन देत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून किरण माने यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव शेअर केला आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, '१ ऑक्टोबर... आज एक वर्ष झालं 'बिग बॉस'च्या त्या नादखुळा घरात पाऊल ठेवलेल्याला. अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो... तब्बल शंभर दिवस टिकून राहिलो त्या घरात! या घरानं माझं आयुष्य लखलखीत करुन टाकलं... संघर्षाचं सोनं केलं... नव्हत्याचं होतं केलं... माझ्या चाहत्यांना पराकोटीचा आनंद दिला...'

'मला पूर्वी ट्रोल करणारेबी प्रेमात पडले, चाहते झाले... द्वेष करणार्‍यांची बोलती बंद झाली... तिथनं परतल्यावर राजधानी सातार्‍यात पाऊल ठेवल्या-ठेवल्या माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी माझी जल्लोषात मिरवणूक काढली ती आयुष्यभर विसरणार नाय गड्याहो! ह्या जादूई घरात पाऊल ठेवण्याआधी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादळाला तोंड दिलं होतं. बलाढ्य यंत्रणेविरुद्ध जीवाच्या आकांतानं लढलो होतो. काळजावर झालेल्या खोट्या आरोपांच्या जखमा ओल्या होत्या. वेदनांनी घुसमटलो होतो. त्यामुळं आता हा माझ्यासाठी खेळ राहिला नव्हता, स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी होती.' , असं ते म्हणाले.

पुढे त्यांनी असं सांगितलं की,'मी जिद्दीची, चिकाटीची, धाडसाची, सत्वाची परीसीमा गाठली... शारीरीक-मानसिक दोन्ही बळामध्ये निम्म्या वयाच्या तरण्याबांड पोरांना जबरी टक्कर देऊन चारी मुंड्या चित केलं... ज्यांना मित्र मानलं त्यांच्यासाठी मात्र सर्वस्व उधळलं. या घरानं मला तेजस्विनी लोणारीसारखी जिवाला जीव देणारी आयुष्यभराची मैत्रीण दिली. राखीबरोबर केलेले हेल्दी फ्लर्टिंग बाहेर प्रेक्षकांनी फुल्ल इन्जॉय केले. विक्याबरोबर नंतर-नंतर बिनसलं, पण तरीबी आम्ही दोघांच्या मैत्रीनं पहिले पाचसहा आठवडे अख्ख्या घराला भुंगा लावला. त्याच्याबरोबरचे ते दिवस अद्भूत होते!'

'हा जो व्हिडीओ हाय... तो 'फायनॅलिस्ट' म्हणून बिगबॉसनं मला केलेला 'सॅल्यूट' होता... माझं कौतुक करताना बिगबॉसनं जे शब्द वापरलेत ते कायमचे काळजात कोरून ठेवलेत. 'अजिंक्य तारा... द किरण माने'! माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं, ते माझं जगातलं सगळ्यात मौल्यवान अवॉर्ड हाय हे...लब्यू बिगबॉस.' , असं म्हणत किरण माने यांनी बिग बॉसचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :पोस्टल मतमोजणी संपली, बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT