Nitish Chavhan And Kiran Gaikwad  Instagram/ @kiran_gaikwad12
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev: भैय्यासाहेबांनी चित्रपट पाहून केले आज्याचे कौतुक; म्हणतो, 'हा चित्रपट तर...'

नितेशच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचे महत्त्वपूर्ण पात्र आहे. त्याच्या जिवलग मित्राने ही त्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'लागिरं झालं जी' मालिका फेम आज्या आणि भैयासाहेब पुन्हा एकत्र दिसले आहेत. निमित्त होते ' हर हर महादेव' चित्रपटाचे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट आला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगण्यात आली आहे. चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकाच फ्रेम मध्ये झळकणार आहेत. त्या चित्रपटात आज्या अर्थातच नितिश चव्हाण ने ही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

नितेशच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचे महत्त्वपूर्ण पात्र आहे. त्याच्या जिवलग मित्राने ही त्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. मालिकेत एकमेकांचे दाखवलेले कट्टर वैरी खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहे. ते म्हणजे नितिश चव्हाण आणि किरण गायकवाड. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्या त्यांच्या अनेक निष्ठावान, धाडसी आणि विश्वासू मावळ्यांपैकी एक म्हणजे धनाजी म्हसकर आणि ते पात्र अभिनेता नितिश चव्हाणनं साकारले आहे.

किरण गायकवाड ही सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो. चित्रपट पाहिल्यानंतर त्याने नितिशचे तोंड भरून कौतुक केले आहे. हे कौतुक त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत केले आहे. पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलय की, 'हर हर महादेव कमाल सिनेमा. महाराजांचा सिनेमा म्हणजे कमाल असणारच. फार शब्द नाहीयेत कारण अशी कलाकृती शब्दात नाही मांडता येणार मला. हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघा म्हणजे कळेल मला नक्की काय व्यक्त व्हायचंय. नीत्या लव्ह यू!

पोस्टसोबत किरणने नितिश सोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत किरणने नितिशला मागून मिठी मारली आहे. दोघांची निखळ मैत्रीतील स्मित हास्य देणारा फोटो प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय. दोघांमध्ये किती सुंदर मैत्री आहे हे या फोटोमधून दिसत आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT