Marathi Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actor Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, रंगभूमीवर शोककळा

Marathi Actor Passed Away : मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे दुःखद निधन झाले.

Shreya Maskar

कला विश्वावर शोककळा!

मराठी रंगभूमीवरील हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

सिनेसृष्टीतून आणखी एक निधनाची बातमी समोर आली आहे. मराठी मनोरंजन विश्वावाला मोठा धक्का बसला. प्रसिद्ध मराठी अभिनेते (Marathi Actor Death) ऋषिकेश कानडे (Hrishikesh Kanade) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे निधन 3 ऑगस्ट 2026 (सोमवारी) पहाटे झाले. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अल्पशा आजाराने अभिनेत्याचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश कानडे यांनी वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषिकेश कानडे यांच्या पश्चात् आई, वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे.

अभिनेत्याचे 'मी भारतीय' हे नाटक खूप गाजले. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने चाहत्यांना आपलस केले. 'मी भारतीय' हे नाटक देशभक्तीवर आधारित आहे. ऋषिकेश कानडे यांना राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष रौप्य पदकाने गौरवण्यात आले.

अभिनेते पुण्याचे रहिवासी होते. ऋषिकेश कानडे यांच्या निधनानंतर मराठी रंगकर्मी, मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT