Famous Filmmaker : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Famous Filmmaker Mother Death : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या आईचे निधन झाले आहे.
Famous Filmmaker Mother Death
Famous FilmmakerSAAM TV
Published On
Summary

चित्रपट निर्मात्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

निर्मात्याच्या आईचे निधन

मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा

सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट निर्माती मीरा नायर यांच्या आईचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या आईच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वातील कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

e24bollywood च्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माती मीरा नायर यांच्या आई प्रवीण नायर यांचे शनिवारी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्या एक एक प्रतिष्ठित आणि यशस्वी समाजसेविका, दानशूर व्यक्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. प्रवीण नायर यांनी 'सलाम बालक ट्रस्ट'ची (Salaam Baalak Trust) सह-स्थापना केली होती. नवी दिल्लीस्थित ही स्वयंसेवी संस्था (NGO) रस्त्यांवरील गरजू मुलांच्या मदतीसाठी कार्य करते.

त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर समाजसेवा आणि चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला आहे.प्रवीण नायर यांनी विकास क्षेत्रात (development sector) दोन दशकांहून अधिक काळ काम केले होते. त्यांच्या मुलीचा १९८८ मधील ऑस्करसाठी नामांकित झालेला हिंदी चित्रपट 'सलाम बॉम्बे!' (Salaam Bombay!) हाच त्यांच्यासाठी स्वतःचे काहीतरी वेगळे कार्य सुरू करण्याची प्रेरणा ठरला.प्रामुख्याने ओडिशामध्ये कार्यरत असताना, त्यांनी रेड क्रॉस, डीएव्ही (DAV) पब्लिक स्कूल आणि 'डेफ अँड डंब असोसिएशन' (मूक-बधिर संघटना) यांच्याशी संबंधित अनेक विकास-विषयक समित्यांचे नेतृत्व केले होते.

Famous Filmmaker Mother Death
Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्व शोकसागरात

सुरुवातीला'सलाम बालक ट्रस्ट'ची सुरुवात केवळ २५ मुले आणि तीन कर्मचाऱ्यांसह झाली होती, पण आज ते २५ हून अधिक निवारागृहे चालवते आणि ८०,००० हून अधिक मुलांचे जीवन सुधारले आहे. ही संस्था मुलांना निवारा, शिक्षण, आरोग्य सुविधा, अन्न, समुपदेशन आणि चांगल्या भविष्यासाठी संधी पुरवते.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com