Zarine Khan Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचे निधन; राहत्या घरी अखेरचा घेतला श्वास

Zarine Khan Death: बॉलिवूड अभिनेता संजय खान यांच्या पत्नी जरीन खान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जरीन यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
Zarine Khan Death
Zarine Khan DeathSaam Tv
Published On

Zarine Khan Passes Away: ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध समाजसेविका अभिनेत्री जरीन खान यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरीन गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाने खान कुटुंब आणि बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे.

जरीन यांच्या पश्च्यात त्यांचे पती संजय खान आणि चार मुले- मुली सुझान खान, सिमोन अरोरा आणि फराह अली खान आणि मुलगा झायेद खान आहेत. त्यांची मुले त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आणि प्रसिद्ध आहेत. यामध्ये हृतिक रोशनची एक्स पत्नी, इंटीरियर डिझायनर सुझान खान आणि अभिनेता झायेद खान आहेत.

Zarine Khan Death
Actress Hospitalised: डिव्होर्सच्या चर्चेदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; 'या' आजारामुळे केलं रुग्णालयात दाखल

चित्रपटांमध्येही काम केले

जरीन खानने स्वतः एकदा मनोरंजन क्षेत्रात काम केले आहे. तिने "तेरे घर के सामने" आणि "एक फूल दो माली" सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण, नंतर तिने तिच्या कुटुंबावर आणि इंटीरियर डिझाइनवर लक्ष केंद्रित केले.

Zarine Khan Death
Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

ही प्रेमकहाणी कधी सुरू झाली?

संजय खान आणि जरीन कतरक यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखी होती. हे कपल बस स्टॉपवर भेटले आणि पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. त्यांनी १९६६ मध्ये लग्न केले. ५९ वर्षांहून अधिक काळ त्यांनी संसार केला. जरीनने आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात तिच्या पतीला साथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com